अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. (sanjay raut address shivsainik, warn to narayan rane)

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:06 PM

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. (sanjay raut address shivsainik, warn to narayan rane)

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले.

बंद दाराआड काय चर्चा झाली सर्वांना माहीत

उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले. एक तरी भाजपाचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात आहे का? असा सवाल करतानाच मी ठाकरे आहे. माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दारा आड चर्चा झाली. सगळ्यांना माहिती आहे काय चर्चा झाली, असं सांगून राऊत यांनी संशय निर्माण केलं आहे.

तर राजकीय खांदा देऊ

नारायण राणेंना आम्ही भाजपाचा मानत नाही. भाजप जर त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार असेल तर आमच्याकडे देखील अनेक खांदे आहेत. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला तयार आहोत, असा इशारा देतानाच राणेंचा आम्ही दोनदा पराभव केला. सत्तेत आल्यावर माणूस सज्जन होतो. त्यांनी हे भान ठेवायला हवं. तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागेल. महाराष्ट्रावर यापुढे देखील सेनेची सत्ता राहील. आज सरकार तीन पक्षांचं आहे, उद्या काय सांगता येत एका पक्षाचं येऊ शकतं, असा दावा त्यांनी केला.

सत्ता मनगटात असते

शिवसेने समोर उभा राहण्याची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. खुर्ची, पद म्हणजे सत्ता नाही. सत्ता आपल्या मनगटात असते. मी मुंबईत राहतो. पण मंत्रालयाकडे फिरकतही नाही. मी दिल्लीत गेलो की लोक बाजूला होतात. माझ्यातली छातीवर वार घेण्याची पॉवर ही खरी सत्ता आहे. सत्ता सदैव बाळासाहेबांची होती. चंदनाच्या चितेवर जाई पर्यंत बाळासाहेबांची सत्ता राहिली, असं त्यांनी सांगितलं.

संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल लक्षात ठेवा

हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू. तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं ते हे विधान करत आहेत. सेनेतून अनेक जण गेले, पण यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उद्धवजींनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्यासाठी मी नाशिकला आलोय. गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं, असं ते म्हणाले. (sanjay raut address shivsainik, warn to narayan rane)

संबंधित बातम्या:

अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राणेंच्या अटकेवर सेनेची पहिली प्रतिक्रिया

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?

(sanjay raut address shivsainik, warn to narayan rane)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.