तू कधी रे कानफटात खाल्ली? तू काय उखाडणार? लाचार माणूस, डरपोक; राणे यांना अरेतुरे करत संजय राऊत यांचा हल्ला

आम्ही राणेंवर टीका केली नाही. टीका करण्यास सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर घाणेरड्या शब्दात चिखलफेक करण्याचं काम या माणसाने केलं.

तू कधी रे कानफटात खाल्ली? तू काय उखाडणार? लाचार माणूस, डरपोक; राणे यांना अरेतुरे करत संजय राऊत यांचा हल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 1:13 PM

नाशिक: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी आज थेट राणेंना अरेतुरे करत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. कोण आहात तुम्ही? आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंवर जोरदार टीका केली.

बाडगा जास्त मोठ्या बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो सिलिंडर जास्त मोठं करतो. सध्या हे सिलिंडर वर करून बोलत आहेत. तुम्ही आमच्याविरोधात उभं राहिला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संयम राखायला सांगितलं. तुम्ही आमची काय उखाडणार? तू कोण आहे? लाचार माणूस आहे. दहापक्ष बदलतो घाबरून. डरपोक. आम्हाला डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

माझ्या माहितीनुसार नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जातंय. त्याला कारणं खूप आहेत. नवीन गटातील लोकांना सामावून घ्यायचं आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरू आहे असं ऐकलं. पीएमओकडे आमचीही माणसं आहेत. आम्हालाही माहिती मिळते. मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडू नका, असं राऊत म्हणाले.

माझ्या आयुष्यात मी पक्ष सोडल्यावर राणेंना भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली हे चांगलं झालं, असा चिमटा त्यांनी काढला.

आम्ही राणेंवर टीका केली नाही. टीका करण्यास सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर घाणेरड्या शब्दात चिखलफेक करण्याचं काम या माणसाने केलं.

आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करण्याचं काम या माणसाने केलं. त्यांच्या मुलांनी केलं. तुम्ही पक्ष सोडला दुसऱ्या पक्षात गेला. शांतपणे जगा. तुम्ही तुमच्या कर्माने जगा, कर्माने मरा, असंही ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.