Sanjay Raut on BJP: रामाचा बाण, हनुमानाची गदा आमच्याकडे, विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला; राऊतांचे नाशिकमध्ये फटाके

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काळारामाची आरती केली. मंदिराच्या नोंदवहीत आपण बटुकेश्वर मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची नोंद केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले...

Sanjay Raut on BJP: रामाचा बाण, हनुमानाची गदा आमच्याकडे, विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला; राऊतांचे नाशिकमध्ये फटाके
नाशिकमध्ये संजय राऊत यांनी काळारामाचे दर्शन घेतले.
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:25 PM

नाशिकः प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील (Kolhapur By Election) निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले. राऊतांनी शनिवाटी पंचवटी येथील सप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आरती केली. यावेळी शिवसैनिकांनी जय श्रीरामची जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणची मतमोजणी सुरू झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी जोरदार आघाडी घेतली. ही बढत तोडणे आता सत्यजित कदमांना जवळपास अशक्य आहे. त्यामुळे निकाल घोषित व्हायच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयी फटाके फोडायला सुरुवात केलीय.

काय म्हणाले राऊत?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी काळारामाची आरती केली. मंदिराच्या नोंदवहीत आपण बटुकेश्वर मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची नोंद केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रभू रामाचे धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीने या दैवतांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले आहे. विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समाचार घेतला.

निवडणुकीच्या तोंडावर घमासान

मुंबई महापालिकेची निवडणूक ध्यानात घेता भाजप विरुद्ध शिवसेनेने आतापासूनच राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिलीय. नाशिकमध्येही आगामी काळात महापालिका निवडणूक होतेय. येथेही मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना अशीच होणाराय. भाजपकडून गिरीश महाजन या निवडणुकीचे नेतृत्व करणार आहेत. तर शिवसेनेकडून स्वतः संजय राऊत ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तयारी करतायत. मनसेनेही या ठिकाणी जोर लावलाय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघताना दिसते आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.