Sanjay Raut Vs MNS : संजय राऊतांनी हनुमान चालीसा म्हणून स्तोत्र म्हणून दाखवलं; पत्रकाराच्या प्रश्नावर आधी गडबडले अन् लगेच भीमदेवी थाट!

ज्या हनुमानाच्या नावावरून राजकारण सुरूय त्यांचे स्तोत्र कोणते आणि चालीसा कोणती, हे सुद्धा राजकीय नेत्यांना माहित नसल्याचे समोर येतेय आणि त्यावरून खुशाल राजकारण सुरूय. हे साऱ्यांच्याच बाबतीत म्हणता येईल. खरे तर आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलेले मारुती स्त्रोत्र हे रामदासांनी रचलेले आहे, तर हनुमान चालीसा तुलसीदासांनी रचल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊ या दोहोंमधील नेमका फरक काय ते.

Sanjay Raut Vs MNS : संजय राऊतांनी हनुमान चालीसा म्हणून स्तोत्र म्हणून दाखवलं; पत्रकाराच्या प्रश्नावर आधी गडबडले अन् लगेच भीमदेवी थाट!
संजय राऊतांनी हनुमान चालीसा म्हणत स्तोत्र म्हटले आणि त्यांची गोची झाली.
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:22 PM

नाशिकः हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून सुरू असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहतोय. निवडणुकीच्या तोंडावर साऱ्याच राजकीय पक्षांनी एकेका दैवताला निवडणुकीच्या फडात उभा केल्याचा भास होतोय. नाशिकमध्ये आज शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमचीच असल्याचे ठणकावून सांगितले. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे म्हणत त्यांनी चालीसेऐवजी हनुमान स्त्रोत्र (Hanuman Stotra) म्हटले. पत्रकारांनी ही हनुमान चालीसा नाही म्हणताच त्यांची थोडी गडबड झालेली पाहायला दिसली. मात्र, आम्हाला या तरी चार ओळी येतात म्हणून त्यांनी विषय रेटून नेला. शिवाय पुन्हा आक्रमक होत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. एकंदर काय, तर ज्या हनुमानाच्या नावावरुन राजकारण सुरूय त्यांचे स्तोत्र कोणते आणि चालीसा कोणती, हे सुद्धा राजकीय नेत्यांना माहित नसल्याचे समोर येतेय आणि त्यावरून खुशाल राजकारण सुरूय. हे साऱ्यांच्याच बाबतीत म्हणता येईल. खरे तर आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलेले मारुती स्त्रोत्र हे रामदासांनी रचलेले आहे, तर हनुमान चालीसा तुलसीदासांनी रचल्याचे म्हटले जाते. यानिमित्ताने आपण जाणून घेऊ स्त्रोत कोणते आणि चालीसा कोणती ते.

काय आहे हनुमान स्त्रोत्र?

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।।१।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ।।२।।

दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा । पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ।।३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ।।४।।

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती । नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ।।६।।

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं । सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ।।८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ।।९।।

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ।।११।।

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें । तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ।।१२।।

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ।।१४।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।।१५।।

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ।।१६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।

॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥

काय आहे हनुमान चालीसा?

जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

महावीर विक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी।। कंचन वरन विराज सुवेसा। कानन कुण्डल कुंचित केसा।।

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै। काँधे मूँज जनेऊ साजै। शंकर सुवन केसरीनंदन। तेज प्रताप महा जग वन्दन।।

विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर।। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया।।

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा। विकट रूप धरि लंक जरावा।। भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र के काज संवारे।।

लाय सजीवन लखन जियाये। श्रीरघुबीर हरषि उर लाये।। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।

सहस बदन तुम्हरो जस गावैं। अस कहि श्रीपति कंठ लगावैं।। सनकादिक ब्रह्मादि मुनीशा। नारद सारद सहित अहीसा।।

जम कुबेर दिगपाल जहां ते। कवि कोविद कहि सके कहाँ ते।। तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा। राम मिलाय राज पद दीन्हा।।

तुम्हरो मंत्र विभीषन माना। लंकेश्वर भये सब जग जाना।। जुग सहस्र योजन पर भानू। लील्यो ताहि मधुर फल जानू।।

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लांघि गये अचरज नाहीं।। दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।

राम दुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे।। सब सुख लहै तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डरना।।

आपन तेज सम्हारो आपै। तीनों लोक हांक तें कांपै।। भूत पिसाच निकट नहिं आवै। महाबीर जब नाम सुनावै।।

नासै रोग हरै सब पीरा। जपत निरंतर हनुमत बीरा।। संकट तें हनुमान छुड़ावै। मन क्रम वचन ध्यान जो लावै।।

सब पर राम तपस्वी राजा। तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावै। सोई अमित जीवन फल पावै।।

चारों युग परताप तुम्हारा। है परसिद्ध जगत उजियारा।। साधु-संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे।।

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। अस वर दीन जानकी माता।। राम रसायन तुम्हरे पासा। सदा रहो रघुपति के दासा।।

तुम्हरे भजन राम को भावै। जनम-जनम के दुख बिसरावै।। अन्त काल रघुबर पुर जाई। जहाँ जन्म हरि-भक्त कहाई।।

और देवता चित्त न धरई। हनुमत सेई सर्व सुख करई।। संकट कटै मिटै सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

जै जै जै हनुमान गोसाईं। कृपा करहु गुरुदेव की नाईं।। जो सत बार पाठ कर कोई। छूटहिं बंदि महा सुख होई।।

जो यह पढ़ै हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरीसा।। तुलसीदास सदा हरि चेरा। कीजै नाथ हृदय महँ डेरा।।

दोहा पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.