राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा; शरद पवारांचे सामाजिक संस्थांना आवाहन

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. (sharad pawar inaugurated covid care centres in nashik)

राज्यात शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा; शरद पवारांचे सामाजिक संस्थांना आवाहन
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 4:01 PM

नाशिक: देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्थांना केलं. नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. (sharad pawar inaugurated covid care centres in nashik)

नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुलात 180 ऑक्सिजन व 115 सीसीसी अशा एकूण 295 बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले. यावेळी पवारांनी हे आवाहन केलं. कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

संकटग्रस्तांना आधार मिळेल

स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगीकरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल, असं ते म्हणाले. कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यावर असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहनही त्यांनी केले.

भुजबळांचे आवाहन

कोविडचे मोठं संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

कोविड सेंटरमध्ये काय

या सदर कोविड सेंटरमध्ये 180 बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले 1 केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. 180 रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून 50 एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे. सर्व बेडवर स्वतंत्र ऑक्सिमिटर आहे. सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह 6 एमबीबीएस व 4 बीएचएमएस असे 11 डॉक्टर तसेच 15 प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, 15 वार्ड बॉय, 10 सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिकमधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

रुग्णांचा मेनू काय?

या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी 3 मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायमचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल. तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे. (sharad pawar inaugurated covid care centres in nashik)

30 टक्के बेड महिलांसाठी राखीव

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. येथील काही 70 टक्के बेड पुरुषांसाठी तर 30 टक्के बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. (sharad pawar inaugurated covid care centres in nashik)

संबंधित बातम्या:

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

बापरे ! मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

प्लाझ्मा दान करण्यासाठी ‘त्या’ मुस्लिम तरुणाने रोजा सोडला; दोन महिलांचा जीव वाचला

(sharad pawar inaugurated covid care centres in nashik)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.