सर्वात मोठी बातमी ! निकाल काही तासांवर असतानाच नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, गावीही नाही; सस्पेन्स वाढला

राज्यातील 16 आमदारांच्या पात्र अपात्रेतवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! निकाल काही तासांवर असतानाच नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, गावीही नाही; सस्पेन्स वाढला
narhari zirwalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 8:54 AM

नाशिक : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालावर राज्य सरकारच्या भवितव्याचा फैसला अधारीत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा फैसलाही आधारीत आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याचा फैसलाही आजच्या निकालातून येणार आहे. हा निकाल यायला अवघे काही तास बाकी असतानाच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक गायब झाले आहेत. झिरवळ यांचा फोन लागत नाही आणि ते त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे झिरवळ गेले तर कुणीकडे गेले? असा सवाल केला जात आहे.

नरहरी झिरवळ यांचे दोन्ही फोन सकाळपासूनच बंद आहेत. ते आपल्या गावीही नाहीत. त्यामुळेही खळबळ उडाली आहे. सत्ता संघर्षावर दुपारी 12च्या आत निकाल येणार आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं होतं.

हे सुद्धा वाचा

आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अपात्रच करेन, असं झिरवळ यांनी म्हटलं होतं. मी कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घेतला होता. माझा निर्णय चुकीचा ठरला तर घटना चुकीची आहे का? असं म्हणावे लागेल, असं विधानही झिरवळ यांनी केलं होतं.

नार्वेकरांचा चिमटा

झिरवळ यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली होती. झिरवळ यांनी विधान केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सक्रिय झाले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन झिरवळ यांच्या विधानावर भाष्य केलं होतं. झिरवळ काय बोलतात याबाबत तेच खुलासा करतील. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना त्यावर थेट भाष्य करू नये. कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने बोललं पाहिजे, असा चिमटा राहुल नार्वेकर यांनी काढला होता.

या आमदारांच्या भवितव्याचा फैसला

1) एकनाथ शिंदे 2) अब्दुल सत्तार 3) संदीपान भुमरे 4) संजय शिरसाट 5) तानाजी सावंत 6) यामिनी जाधव 7) चिमणराव पाटील 8) भरत गोगावले 9) लता सोनावणे 10) प्रकाश सुर्वे 11) बालाजी किणीकर 12) अनिल बाबर 13) महेश शिंदे 14) संजय रायमुलकर 15) रमेश बोरणारे 16) बालाजी कल्याणकर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.