नाशिक : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालावर राज्य सरकारच्या भवितव्याचा फैसला अधारीत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा फैसलाही आधारीत आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याचा फैसलाही आजच्या निकालातून येणार आहे. हा निकाल यायला अवघे काही तास बाकी असतानाच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक गायब झाले आहेत. झिरवळ यांचा फोन लागत नाही आणि ते त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे झिरवळ गेले तर कुणीकडे गेले? असा सवाल केला जात आहे.
नरहरी झिरवळ यांचे दोन्ही फोन सकाळपासूनच बंद आहेत. ते आपल्या गावीही नाहीत. त्यामुळेही खळबळ उडाली आहे. सत्ता संघर्षावर दुपारी 12च्या आत निकाल येणार आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं होतं.
आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अपात्रच करेन, असं झिरवळ यांनी म्हटलं होतं. मी कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घेतला होता. माझा निर्णय चुकीचा ठरला तर घटना चुकीची आहे का? असं म्हणावे लागेल, असं विधानही झिरवळ यांनी केलं होतं.
झिरवळ यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली होती. झिरवळ यांनी विधान केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सक्रिय झाले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन झिरवळ यांच्या विधानावर भाष्य केलं होतं. झिरवळ काय बोलतात याबाबत तेच खुलासा करतील. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना त्यावर थेट भाष्य करू नये. कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने बोललं पाहिजे, असा चिमटा राहुल नार्वेकर यांनी काढला होता.
1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) संजय शिरसाट
5) तानाजी सावंत
6) यामिनी जाधव
7) चिमणराव पाटील
8) भरत गोगावले
9) लता सोनावणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) अनिल बाबर
13) महेश शिंदे
14) संजय रायमुलकर
15) रमेश बोरणारे
16) बालाजी कल्याणकर