मतदार यादीत एकाच व्यक्तीचे पाच ठिकाणी नावे, मालेगावात धक्कादायक प्रकार उघड

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याचा संशय शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मतदार याद्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात एकाच मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आणि फोटो चार ते पाच ठिकाणी आढळून आले.

मतदार यादीत एकाच व्यक्तीचे पाच ठिकाणी नावे, मालेगावात धक्कादायक प्रकार उघड
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 8:19 PM

मनोहर शेवाळे, Tv9 प्रितिनधी, मालेगाव : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य मतदारसंघात मतदारांचा आकडा फुगविण्यासाठी एकाच मतदाराची पाच ठिकाणी बोगस नोंद करण्यात आली आहे. अशा तीन दिवसात मालेगाव बाह्य विधानसभेत तब्बल 9 हजार बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासकीय यंत्रनेला हाताशी धरून हा प्रकार करण्यात आल्याचा भंडाफोड शिवसेना ठाकरे गट आणि बारा बलुतेदार संघटनेच्यावतीने करण्यात आला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अन्यथा ठाकरे गट रस्त्यावर उतरेल, असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याचा संशय शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मतदार याद्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात एकाच मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आणि फोटो चार ते पाच ठिकाणी आढळून आले. प्रशासनाने आगामी विधानसभा निवडणुका पार्शदर्शक व्हाव्यात, यासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीत पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी एक व्यक्ती एक मत या आधारावर होण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. असे असताना मतदार यादीत एकाच मतदाराचे एका पेक्षा जास्त नावे आढळून येत आहेत. आतापर्यंत आठ हजार मतदारांची दोन, तीन, काहींचे चार ठिकाणी नाव आढळली आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

प्रशासनाला पुरावे सादर

बोगस मतदार आढळून आल्यासंदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नावांच्या पुराव्यासहित असलेली यादी प्रशासनाला सादर केली आहे. तसेच मालेगाव मध्य आणि बाह्य विधानसभा, सटाणा (बागलाण), नाशिक सिडको या मतदारसंघातील मतदारांचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकापेक्षा जास्त मतदार असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदरील व्यक्तींचे इतर ठिकाणी असलेले मतदान रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

‘उच्च न्यायालयात दाद मागणार’

प्रशासनाना पुरावे सादर करण्यात येणार असून प्रशासनाने पारदर्शकपणे कामे करावी, सादर केलेल्या प्राव्याची यादीची शाहनिशा करावी. एका पेक्षा जास्त ठिकाणी असलेली नावे त्वरित रद्द करावेत. यासाठी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास आदेश द्यावे, जबाबदार असलेले बीएलओ विरुद्ध कारवाईचे आदेश व्हावे, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार, असा इशारा देण्यात आल्याची माहिती बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडू काका बच्छाव यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.