‘मी कधीच जय श्री राम म्हणत नाही’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

"महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढते आहे का? मला अनेकदा भीती वाटत होती की, संपूर्ण देश राईटिस्ट होतो की काय? मला जर कोणी म्हणाले की पुन्हा खासदार होण्यासाठी पांडुरंगाला साकडं घाला. तर मी म्हणेल एवढ्यासाठी कशाला पांडुरंगाला त्रास देऊ? मी मेहनत करेन", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'मी कधीच जय श्री राम म्हणत नाही', सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही... सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 6:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे या शिक्षण संस्थांबद्दल बोलत होत्या. यावेळी त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. “शिक्षण संस्थांच्या कार्यक्रमाला जाताना मला खूप गंमत वाटते. कारण माझी मार्कशिट तुम्ही बघितलेली नाही. अनेक कुटुंबांनी योगदान दिलं म्हणून हे रोपटं मोठ झालं. ज्या दिवशी रिझल्ट येतो त्या दिवशी मी उलटी गिनती सुरू करते. माझ्या पहिल्या इलेक्शनमध्ये मोबाईल होता. पण एवढं नव्हत. तंत्रज्ञानाचा उपयोग इलेक्शनमध्ये आता मोठ्या प्रमाणात होतोय. थ्रीडी पद्धतीने आम्ही नेत्यांचे भाषण सादर केले. पोलीस भरतीसाठी आलेले मुलंमुली फूटपाथवर झोपल्याचे आज बातम्यांमध्ये बघितलं. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनासाठी असायला हवं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढते आहे का? मला अनेकदा भीती वाटत होती की, संपूर्ण देश राईटिस्ट होतो की काय? मला जर कोणी म्हणाले की पुन्हा खासदार होण्यासाठी पांडुरंगाला साकडं घाला. तर मी म्हणेल एवढ्यासाठी कशाला पांडुरंगाला त्रास देऊ? मी मेहनत करेन. मी कधीच जय श्री राम म्हणत नाही. मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही’

“मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात आणू, असं मध्ये म्हणत होते. बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही. संविधानात नसलेली मनुस्मृती तुम्ही शिक्षणात लादणार असाल तर आम्ही टोकाचा विरोध करू. सरकारी नोकरी कॉन्ट्रॅक्टवर होता कामा नये. जे आहे ते चालू ठेवा एवढीच आमची सरकारला विनंती आहे”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

‘हे मान्य नाही’

“आम्ही यावेळी खूप संघर्ष केला. चिन्हं नव्हतं, पक्ष नव्हता, पण आम्ही संघर्ष केला आणि तुम्ही बघता महाराष्ट्रात काय झालं. नवीन शैक्षणिक धोरण आल्यावर मी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अभिनंदन केले. 1500 रुपये देत आहेत, त्याचं स्वागत, पण त्याच्या बरोबर आलेली धमकी मान्य नाही. पैसे पण द्यायचे आणि धमकी पण द्यायची हे मान्य नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘पारदर्शक शिक्षण द्या’

“पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती इंग्रजीत शिकली ती म्हणजे मी. मराठी भाषेला केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा द्यायला हवा. मराठी भाषेसाठी चर्चा झालीच पाहिजे. मराठी भाषा फक्त भाषा दिन साजरी करून संपत नाही. प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिक्षणासाठी हवी. हे कधी रडीचा डाव खेळतील माहिती नाही, पण निवडणुका झाल्यानंतर आपल्या विचारांचा मुख्यमंत्री बसल्यानंतर मराठी शाळेसाठी काम करणार. पवित्र पोर्टल बंद करून टाका आणि पारदर्शक शिक्षण द्या. AI चा सर्व्हे आला की हा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होईल. पण AI नाही तर तुम्ही ठरवणार. मला कोणाचा मोबाईलनंबर पाठ नाही. शिक्षकाची जागा कधीही AI घेऊ शकणार नाही”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.