आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू, चांगले संस्कार दिले नाही; सुषमा अंधारे यांचा घणाघात

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होत आहे. या मागणीला त्यांनी विरोध केला. काही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहेत. त्यांची मागणी पूर्ण होणार नाही. ही भाजपची पिलावळ आहे.

आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू, चांगले संस्कार दिले नाही; सुषमा अंधारे यांचा घणाघात
आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहे, चांगले संस्कार दिले नाही; सुषमा अंधारे यांचा घणाघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 12:30 PM

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतानाचा एक व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे प्रचंड संतापल्या असून त्यांनी थेट निलेश राणे आणि नितेश राणे यांचे संस्कारच काढले आहेत.

सुषमा अंधारे या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राणे कुटुंबावर हल्ला चढवला. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरहील जोरदार हल्ला चढवला. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहेत. ते गृहमंत्र्यासारखे वागत नाहीत. एकाच पक्षाचे असल्या सारखे वागतात. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

सगळी खाते फडणवीस यांच्याकडे आहेत. याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होत आहे. या मागणीला त्यांनी विरोध केला. काही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहेत. त्यांची मागणी पूर्ण होणार नाही. ही भाजपची पिलावळ आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. अब्दुल सत्तार प्रचंड खोटं बोलतात. त्यांचं इमान कोणत्याच पक्षासोबत नाही. त्यांनी स्वतःच्या मतदार संघात असंस्कृतपणाचा कळस गाठला आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.