कोरोनाची लस घ्या अन् पैठणी जिंका; येवल्यातल्या साईनाथ मंदिराचा अनोखा उपक्रम
कोरोनाच्या दोन लाटांचे तडाखे बसूनही अनेक जण लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. अशा नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घ्या अन् पैठणी जिंका, असा अनोखा उपक्रम येवल्यातले साईनाथ मंदिर राबवत आहे.
नाशिकः कोरोनाच्या दोन लाटांचे तडाखे बसूनही अनेक जण लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. अशा नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लस घ्या अन् पैठणी जिंका, असा अनोखा उपक्रम येवल्यातले साईनाथ मंदिर राबवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे त्यात सिन्नर आणि निफाड तालुक्यात ही वाढ होताना दिसत आहे. हा संसर्ग एका झटक्यात सगळीकडे पसरू शकतो. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारीप्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात सध्या 911 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3 लाख 99 हजार 243 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगरमधील वाढते कोरोना रुग्ण पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सध्या रुग्णवाढीमुळे हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. ही सारी परिस्थिती लक्षा घेता नाशिक जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले होते. वाढती रुग्ण संख्या पाहता प्रशासनातर्फे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेकजण अजूनही पाठ फिरवताना दिसत आहेत. हे पाहता येवला येथील साईनाथ मंदिर ट्रस्टने लस घ्या आणि पैठणी जिंका हा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आतापर्यंत 100 ड्रॉ काढण्यात आले असून, शंभर पैठणींचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी लस घेतल्यानंतर दर तासाला लकी ड्रॉ काढून 20 पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात येत होत्या. असे एकूण दिवसभरात 100 ड्रॉ काढून 100 पैठणी लसीकरण झालेल्या नागरिकांना बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या आहेत, अशी माहिती साईनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश काबरा यांनी दिली आहे.
नवरात्रोत्सवात कोरोना नियम कडक
कोरोना काळातही वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.
इतर बातम्याः
आरारारा खतरनाक; सोनं नॉनस्टॉप स्वस्त!https://t.co/TE9RjuwUQV#BullionMarket|#Gold|#Nashik|#silver
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021