“शिवसेना फक्त ठाकरेंची, नाही कोणाच्या बापाची”; ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेवर थेट दावाच केला
शिवगर्जना अभियानाअंतर्गत ठाकरे गटासाठी मोठी कामं करायची आहेत. आता काम करून निवडणुका कधीही लागल्या तरी सामोरंय जायचे आहे.
नाशिकः ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाला (Shivgarjna Abhiyan) नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील सौभाग्य लॉन्समध्ये ठाकरे गटाचा (Thackeray Group) मेळावा होत आहे. यामध्ये माजी मंत्री अनंत गीते, ठाकरे गटाचे नेते विजय औटी, वरूण सरदेसाई, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहे. या मेळाव्याला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. यामध्ये महिलांची संख्यादेखील लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये शिवगर्जना अभियान कार्यकर्त्यांच्या उपस्थित होत असल्याने नाशिकमधील राजकारण प्रचंड तापले आहे. यावेळी वरूण सरदेसाई यांनी सत्ताधारी विरोधकांवर टीका करताना जोरदार हल्लाबोल केला आहे.
वरूण सरदेसाई यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना फक्त ठाकरेंची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत शिवसेनेवर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दावा केला आहे.
शिवसेनेतून ज्यांनी बंडखोरी केली अस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या नेत्यांचं सगळं आधीच ठरले आहे आणि ते स्क्रिप्टेटड असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वरूण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे गटाच्याच असून ती इतर कुणाच्याही होऊ शकत नाही. त्याचवेळी ते म्हणाले की, कार्यकर्ते गेले, नाव, चिन्ह सोडले म्हणजे शिवसेना संपली असं होत नाही असंही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठणकावून सांगितले आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी उद्धव ठाकरे यांना मानणारे सर्व शिवसैनिक आहेत. राज्यात ज्या बंडखोर आमदारांनी बंड करून राज्यात सत्तांतर घडवून आणले.
त्यानंतर काही टीव्ही चॅनल्सनी सर्व्हे केला होता. त्यामध्ये 95 टक्के जनतेने सांगितले की, शिवसेना ही फक्त ठाकरेंची असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवगर्जना अभियानातंर्गत कोणती काम केली जाणार आणि कोणती कामं करायची आहेत.
त्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कामाच्या विभागणी विषयी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जी काही कामे केली ती आपल्याला पोहोचवायची नाहीत तर त्यापेक्षा वेगळी कामं घेऊन जनतेकडे जायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवगर्जना अभियानाअंतर्गत ठाकरे गटासाठी मोठी कामं करायची आहेत. आता काम करून निवडणुका कधीही लागल्या तरी सामोरंय जायचे आहे.
मात्र निवडणुका घ्यायला भाजप किंवा गद्दारांचा गट तयार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाकरे गटासाठी आता आपल्याला संघटीत व्हावं लागेल त्यामुळे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही मोठी जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यासाठी आता शिवगर्जना अभियानाअंतर्गत मोठं काम करून प्रत्येक वॉर्ड आपल्याला पिंजून काढायचा आहे असंही वरूण सरदेसाई यांनी सांगितले.