“आमचे प्रबोधनकार म्हणायचे, दारूची नशा जाते, मात्र ….”; ठाकरे गटाने एकाच वाक्यात सत्ताधाऱ्यांना निकालात काढले

खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर आणि भाजपसह टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना 2014 साली निवडणूक प्रचारासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी 27 सभा घेतल्या होत्या.

आमचे प्रबोधनकार म्हणायचे, दारूची नशा जाते, मात्र ….; ठाकरे गटाने एकाच वाक्यात सत्ताधाऱ्यांना निकालात काढले
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 7:31 PM

नाशिकः सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक पदवीधर मतदार संघ प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामुळे आता या सत्यजितत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या लढतीकडेही साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटावर टीका करताना त्यांनी सध्या निष्ठा कमी आणि निसटणे जास्त असल्याचे सांगत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजकीय, सामाजित आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या महाराष्ट्राकडे देश आणि जग एका वेगळ्या नजरेने बघत असतात. मात्र राजकीय घडामोडींमुळे हे बदलले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्यजित तांबे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांब्याचे पितळ होईल, हे लक्षात असा थेट इशारा त्यांनी तांबे पितापुत्रानाही दिला आहे. त्यांचे नाव जरी सत्यजित असले, तरी हे लोक त्यांना या निवडणुकीत पाडतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर आणि भाजपसह टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना 2014 साली निवडणूक प्रचारासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी 27 सभा घेतल्या होत्या.

एवढ्या सभा कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नव्हत्या असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला. इतक्या सभा घेऊनही नरेंद्र मोदी यांच्या छाताडावर बसून उद्धव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अरविंद सावंत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगताना त्यांनी आमचे प्रबोधनकार म्हणायचे, दारूची नशा जाते, मात्र सत्तेची नशा जात नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

शुभांगी ताई तुमच्या नावात शुभ आहे आणि उद्या आमच्या सोबत शुभ होणार आहे असल्याचा विश्वास व्यक्त करत 75 वर्षात गॅसची किंमत कधी बारशे रुपये झाली नव्हती असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सध्या राज्यासह देशातील युवकांची परिस्थिती गंभीर आहे. पदवीधर युवकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर डिग्री माझ्या पदरी, पण रोजगारासाठी फिरतो दारोदारी अशी अवस्था येथील युवकांची झाली आहे. त्यामुळे तुमची चिड निवडणुकीत व्यक्त करा असा सल्ला त्यांनी मतदारांना दिला आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधानाची आठवण करुन दिली आहे. लढाऊ नाही झाले तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका असं म्हणत बंडखोर आमदारांना त्यांनी टोला लगावला आहे.

बंडखोरी आमदारांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नाही. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून हे लोकं गुवाहाटीला गेले आणि दगाफटका केला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

धनुष्यबाणाच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले की, देशातील न्यायव्यवस्था न्याय देण्यासाठी विलंब करत आहे. त्यामुळे लोकशाहीचे चार स्तंभ हलत आणि ते ढळमळले आहेत. त्यामुळे पदवीधर लोकांनी इकडं लक्ष द्या असं जाहीर आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.