तीन मजली इमारत बघता बघता कोसळली; जळगावमधल्या पाचोऱ्यातली घटना, बघ्यांची तोबा गर्दी
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात (Pachora) पावसामुळे तीन मजली इमारत कोसळल्याची (building collaps) घटना घडली. सुदैवाने या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही.
नाशिकः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात (Pachora) पावसामुळे तीन मजली इमारत कोसळल्याची (building collaps) घटना घडली. सुदैवाने या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही. (The three-story building collapsed; Incident at Pachora in Jalgaon)
पाचोऱ्यातल्या वल्लभभाई पटेल मार्गावर अगदी मध्यवस्तीत ही इमारत होती. सध्या मुंबईत राहणाऱ्या साजेदाबी शेख खलिल यांनी पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम केले होते. मात्र, बांधकाम करताना इमारतीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. त्यामुळे इमारतीला अनेक तडे गेले होते. त्यात यंदाच्या पावसाळ्यातले पाणी इमारतीत मुरले. त्यामुळे इमारत फुगली होती. ही वास्तू राहण्यास धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली होती. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास इमारत ढासळायला सुरुवात झाली. तेव्हा बघ्यांनी गर्दी केली. अनेकांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. इमारत पडतानाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
जळगावात अतिक्रमण हटाव
सध्या जळगावमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागकडील 20 किलोमीटर अंतराचे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. पक्के अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढावेत. अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
सात फुटापर्यंत पाडापाडी
जळगावमध्ये महापालिकेने रस्त्याची मोजणी केली आहे. त्यानुसार चक्क सात फुटापर्यंत अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यात अनेकांची दुकाने आहेत. या दुकानदारांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना स्वतःहून पक्के अतिक्रमण काढण्याचा वेळ देण्यात आला आहे.
पालकमंत्री आक्रमक
गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणांचा प्रश्न उपस्थित केला होता. इच्छादेवी मार्ग, शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा शिरसोली नाका परिसरांवर नेहमी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकने ही कारवाई सुरू केली आहे.
कारवाई व्यवस्थित करावी
महापालिकेने अतिक्रमण हटावची कारवाई व्यवस्थित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेकदा अतिक्रमण हटावच्या नावाखाली घरावर बुलडोझर चालवला जातो. मात्र, त्यात अतिक्रमण बांधकामासोबत इतरही बांधकाम पाडले जाते. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होते. इतक्या दिवस गप्प बसणाऱ्या पालिकेला अशी अचानक उशिरा जाग आली आहे. त्यामुळे अतिक्रमण असले तरी अनेक ठिकाणी पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. (The three-story building collapsed; Incident at Pachora in Jalgaon)
इतर बातम्याः
नाशिकमध्ये गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी, नदीकाठची मंदिरे पाण्याखाली