नाशिकः सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला…गंगाघाटावर पोहणे पडले महागात

नाशिकमधल्या (Nashik) गंगाघाट (Ganga Ghat) परिसरात पोहणारा एक तरुण सांडपाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (21 सप्टेंबर) घडली. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी कटरने जाळी कापून नाल्यात अडकलेल्या तरुणाची नाल्यातून सुटका केली.

नाशिकः सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला...गंगाघाटावर पोहणे पडले महागात
नाशिकमध्ये वाहून गेलेल्या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले.
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 12:57 PM

नाशिकः नाशिकमधल्या (Nashik) गंगाघाट (Ganga Ghat) परिसरात पोहणारा एक तरुण सांडपाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी (21 सप्टेंबर) घडली. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी कटरने जाळी कापून नाल्यात अडकलेल्या तरुणाची नाल्यातून सुटका केली. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण बालंबाल बचावला. (The youth who was swimming in the river Godavari was carried away and was rescued by the fire brigade)

नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर दिवसभर मुलांचे पोहणे सुरू असते. मात्र, पाण्याचा लोट वाढला की, दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच घटना आज घडली. गंगाघाट परिसरात अमरदीप मोहनराय (वय 18) हा तरुण पोहत होता. त्याच्यासोबत इतर अनेकजणही होते. मात्र, अचानक सांडपाण्याचा जोर वाढला. याचा अंदाज अमरदीपला आला नाही. त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहून गेला. त्याने जीवाच्या आंकाताने प्रयत्न केले. मात्र, त्याला फिरता आले नाही. अखेर तो सांडपाणी जाणाऱ्या नाल्यात जाऊन अडकला. अमरदीपने सांडपाणी जाणाऱ्या जाळीला घट्ट पकडले आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी गर्दी केली. नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ गंगाघाटावर हजेरी लावली. त्यांनी कटर मशीनने जाळी कापून या तरुणाची सुखरूप सुटका केली.

मुलांचे पोहणे धोकादायक

सध्या नाशिकची गोदावरी तुंडूंब भरली आहे. या महिन्यात गोदावरीला पहिला पूर आला होता. मात्र, तरीही गोदापात्रात दिवसभर लहान मुलांचे पोहणे सुरू असते. यात अनेकजण दहा-बारा वर्षांची मुले असतात. सध्या दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. पाऊस वाढला, तर पात्रातले पाणी वाढू शकते. अजून एखादी दुर्घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी नदीपात्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. लहान मुलांना पोहण्यासाठी मज्जाव केला, तर अशा घटना टळू शकतात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत. (The youth who was swimming in the river Godavari was carried away and was rescued by the fire brigade)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.