नाशिक जिल्ह्यात 687 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 334 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 687 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 334 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 687 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 36 ने घट झाली असून, आत्तापर्यंत 8 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
नाशिक ग्रामीणमध्ये नाशकात 52, बागलाण 7, चांदवड 29, देवळा 5, दिंडोरी 20, इगतपुरी 4, कळवण 11, मालेगाव 4, नांदगाव 12, निफाड 98, पेठ 1, सिन्नर 113, त्र्यंबकेश्वर 4, येवला 46 अशा एकूण 406 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 253, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 18 रुग्ण असून अशा एकूण 687 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 673 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 70 लाख 68 हजार 510 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 88 हजार 397 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 09 हजार 322 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 99 हजार 896 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 778 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.
उत्तर महाराष्ट्राला दिलासा
उत्तर महाराष्ट्राला कोरोनाने तूर्तास दिलासा दिला असून, विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चक्क 97.63 टक्क्यांवर गेले आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे.
डेंग्यू, चिकुन गुन्याचा उद्रेक
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान डेंग्यूचे एकूण 2295 नमुने घेण्यात आले. त्यात 888 रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात चिकुन गुन्याचे 2295 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 633 रुग्ण आढळले आहेत. आता परतीच्या पावसाने थैमान घातल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यात या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या आठवड्यात महापालिकेने 258 रुग्णांचे नमुने तपासले. त्यातही 55 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे. महापालिकेने चिकुन गुन्याचे 94 नमुने तपासले आहेत. त्यात 23 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
इतर बातम्याः
फडणवीस ‘क्लीन मास्टर’, भुजबळांची सडकून टीका; ठाकरे-पवारांसारखेच मुख्यमंत्री लक्षात राहतात…!
लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!
सोन्याचे दर पुन्हा वाढतायत, जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!https://t.co/42n9aSALcG#Gold|#Nashikbullionmarket|#silver
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021