साहित्य संमेलनाला आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, साहित्य नगरीत खळबळ; दोघांना माघारी पाठवले
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळा भरला आहे. या साहित्य संमेलानासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आहेत.
नाशिक: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनात आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. हे दोन्ही रुग्ण पुण्याहून आले होते. त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना साहित्य संमेलनात प्रवेश नाकारण्यात असून त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळा भरला आहे. या साहित्य संमेलानासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आहेत. मात्र, प्रत्येकाची कोविड चाचणी करूनच त्यांना आत सोडलं जात आहे. आजही साहित्य संमेलनाला आलेल्यांची तपासणी करून आत सोडले जात असताना दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले. त्यामुळे या दोघांना संमेलनस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. हे दोघेही पुण्याहून आले होते. त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आले. मात्र, हे दोन रुग्ण आढळल्याने संमेलन स्थळी एकच खळबळ उडाली होती.
संमेलनातील आजचे कार्यक्रम
सकाळी 9 वाजता बालसाहित्य समजून घेऊया बदलत्या काळातील बालसाहित्य संवाद
10 वाजता मुलांशी गप्पा गोष्टी (साहित्यिक प्रश्न)
10.30 वाजता बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास
11.30 वाजता खगोल ते भूगोल
दुपारी 12 वाजता कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान
दुपारी 1 वाजता बालसाहित्य समारोप कार्यक्रम
सकाळी 11 वाजता फार्मसी बिल्डिंग येथे
ऑनलाइन वाचन वाड्मय विकासाला तारक की मारक परिसंवाद
दुपारी 1 वाजता इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड परिसंवाद
रात्री 8 ते 10 जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्य मंडपतील कार्यक्रम
सकाळी 9.30 वाजता शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने राजसत्तेचा निर्दयीपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.
सकाळी 11.30 वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती 151 वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्प परिसंवाद
दुपारी 1.30 वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण परिसंवाद
सायंकाळी 4 वाजता समारोप कार्यक्रम
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 5 December 2021 pic.twitter.com/mNZ6o6uFia
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2021
संबंधित बातम्या:
Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?