‘सत्य’ की ‘जीत’ होणार? पदवीधर, शिक्षक मतदार संघाचा निकाल काय?, मतमोजणी सुरू; विजयाचे पोस्टरही लागले

मतमोजणी सुरू होत नाही तोच सत्यजित तांबेा यांच्या विजयाचे नाशिकमध्ये पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तांबे यांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

'सत्य' की 'जीत' होणार? पदवीधर, शिक्षक मतदार संघाचा निकाल काय?, मतमोजणी सुरू; विजयाचे पोस्टरही लागले
Mlc electionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:45 AM

नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागला आहे. या पाचही जागांसाठींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन तासात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. पाचही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. परंतु, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुसतीच चुरशीची नव्हे तर प्रतिष्ठेचीही असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पाचही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. आधी पोस्टल मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत कुणाच्या बाजूने कौल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

निकालाआधीच पोस्टरघाई

दरम्यान, मतमोजणी सुरू होत नाही तोच सत्यजित तांबेा यांच्या विजयाचे नाशिकमध्ये पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तांबे यांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तांबे समर्थकांना बॅनरबाजीची एवढी घाई काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे हे कालपासून अज्ञातस्थळी गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तांबे हे दुपारी 3 वाजता मतमोजणी केंद्रावर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोण कुठे उभे?

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजित पाटील विरुद्ध मविआचे धीरज लिंगाडे असा सामना होत आहे. अमरावती पदवीधरसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातून मतदान झाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआच्या शुभांगी पाटील, वंचितचे रतन बनसोडे आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात लढत होणार आहे. तांबे यांनी या निवडणुकीत काँग्रेसविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठवाडा शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीकडून विक्रम काळे उभे आहेत. तर, भाजपकडून किरण पाटील लढत आहेत. प्रदीप साळुंखे हे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. तर अपक्ष उमेदवार म्हणून नागो गाणार हे निवडणूक लढत आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघात मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.