तर पाव मुख्यमंत्री झालेले फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते; उद्धव ठाकरे यांची तुफान टोलेबाजी

| Updated on: Jan 23, 2024 | 9:33 PM

एका बाजूला बंदोबस्तात राहणार. दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणांचा पगार सामानान्यांच्या खिशातून जातोतय, यंत्रणांनीही हे लक्षात ठेवावं. भेकड लेकाचे. बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. भेकडांची पार्टी आहे. आजपासून या पक्षाला भेकड जनता पार्टीच म्हणा. स्वत:मध्ये कर्तृत्व नाही. नेता तर देऊ शकत नाही. भेकड तर आहातच पण भाकडही आहात. आणि म्हणे हे हिंदुत्ववादी. हे कसले हिंदुत्ववादी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तर पाव मुख्यमंत्री झालेले फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते; उद्धव ठाकरे यांची तुफान टोलेबाजी
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक | 23 जानेवारी 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. हा हल्ला चढवतानाच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फटकारे लगावले. फडणवीस आज पाव मुख्यमंत्री आहेत. भाजपने युती तोडली नसती तर आज फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरून उद्धव ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी ते बोलत होते.

राम एकवचनी होते. सत्यवचनी होते. मी शिवाजी पार्कवर आईवडिलांची शपथ घेऊन सांगितलं की, अमित शाह यांनी वचन मोडलं. त्यांनी वचन नाही पाळलं. वचन मोडूनही तुम्ही स्वत:ला रामभक्त समजता? वचन मोडलं नसतं तर आज फडणवीस अर्धा नव्हे, पाव मुख्यमंत्री झालेत. आता ते अडीच वर्ष पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता? तुम्ही जी फोडाफोडी केली त्यामुळे हे घडलं. आज ही ताकद तुमच्यासोबत राहिली असती. आज तुम्हाला वारंवार महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती. तुम्हाला सन्मानाने निवडून दिल्लीत पाठवलं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाजपेयी केराच्या टोपलीत टाकणार होते

यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही जोरदार हल्लाबोल केला. आम्ही राम मंदिर बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिलो होता. काश्मीरमधील 370 कलम हटवण्यासाठी पाठिंबा दिला होता. कठीण काळात तुम्हाला शिवसेनेची सोबत लागली. वाजपेयी यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला मदत केली. ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात? हे तुमचं हिंदुत्व? संपवताना या मग मैदानात. आम्ही मैदानात आहोत. जो फैसला होईल तो मंजूर आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

या हिंमत असेल तर…

हे कडेकोट बंदोबस्तात राहणार. आमचं संरक्षण काढलं. आहे ते संरक्षणही काढा. समोर बसलेला जमाव आमचं संरक्षण आहे. या अंगावर… यायचं असेल तर या. तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता, आमच्या शेतकऱ्यांची सुकलेली छातीच तुम्हाला भारी पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हे पाय ताणून बसतात

समोर बसलेला शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. माझ्या वडिलांनी दिलेला हा वारसा घेऊन मी निघालो आहे. दंगल झाली की पळणारी ही अवलाद आहे. आमच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोकं. येऊ दे आमची सत्ता. तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा, असा इशाराही त्यांनी दिला.