University of Health Sciences : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार दोन सत्रात, दोन्ही टप्प्यांच्या तारखा एका क्लिकवर
दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical course) वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षेचा आहे, असेही सांगण्यात आले आहे.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University of Health Sciences) उन्हाळी सत्रातील परीक्षा (Exam) या दोन टप्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या परीक्षा 19 मे पासून सुरू होणार आहेत. याचा पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे. तर दुसरा टप्पा हा आरोग्य विज्ञान शाखेच्या परिचर्या व सर्व आरोग्य विद्याशाखेच्या पदवीच्या परीक्षा (Exam Date) 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. यासाठी तब्बल 45 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती सोर आली आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील विविध केंद्रांवर उन्हाळी सत्र-2022 ही परीक्षा एकूण 2200 विद्यार्थी देणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical course) वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षेचा आहे, असेही सांगण्यात आले आहे.
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
दुसऱ्या सत्रातील या परीक्षा 01 जुलै 2022 पासून सुरू होणार असून त्या 31 ऑगस्ट 2022 रोजी समाप्त होणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. या परीक्षा यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अविरत प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाच्या परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकून देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेची प्रक्रिया वेगवान
विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2021 परीक्षेचे निकाळ 14 दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने पार पडत आहे.सद्य स्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या 74661 विद्यार्थ्यांचे सर्व वर्षांच्या हिवाळी 2021 परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनही करण्यात येत आहे, सदर परीक्षांचे निकाल मे-2022 अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा फटाक इतर क्षेत्रांना बसला आहे. तसाच फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मात्र ही परीक्षेची प्रक्रिया वेगाने पार पडत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.