Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: जलनेती केल्यास कोरोना संसर्ग टाळता येतो; नाशिकच्या महापौरांचा प्रात्यक्षिकांसह दावा

जलनेतीचा प्रयोग केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असा दावा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. (use jal neti for fight against coronavirus, says mayor satish kulkarni)

Video: जलनेती केल्यास कोरोना संसर्ग टाळता येतो; नाशिकच्या महापौरांचा प्रात्यक्षिकांसह दावा
satish kulkarni
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 11:34 AM

नाशिक: जलनेतीचा प्रयोग केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असा दावा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर कुलकर्णी यांनी जलनेतीचा प्रयोग करून दाखवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (use jal neti for fight against coronavirus, says mayor satish kulkarni)

महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिककरांनी जलनेतीचा प्रयोग करण्याचं आवाहन केलं आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी मीडिया आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जलनेतीचा प्रयोगच करून दाखवला. त्यामुळे उपस्थित असलेले सर्वचजण अचंबित झाले. मात्र, जलनेतीने खरोखरच कोरोनापासून बचाव करता येतो का? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कोरोनावर जलनेती उपयुक्त

राज्यातील कोरोनाची परिस्थिती सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी जलनेती अत्यंत उपयुक्त आहे. योगशास्त्रातही जलनेतीचं महत्त्व विशद करण्यात आलं आहे. जलनेतीचा प्रयोग केल्यास नाक आणि तोंडातून होणारा कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असं सतीश कुलकर्णी यांनी सांगितलं.

जलनेतीसाठी आवश्यक साधने

जलनेती करण्यासाठी एक भांडं, चिमूटभर मीठ आणि कोमट पाणी हवं. जलनेतीचं भांडं लांब आणि निमूळत्या आकाराचं असावं. नाकातून पाणी सोडता येईल, असं ते भांडं असावं.

जलनेतीचे फायदे

रोज जलनेती केल्यास नासिका स्वच्छ राहतात. त्यामुळे नाकातील धूळ आणि बॅक्टेरियाचे कण निघून जातात. जलनेतीमुळे नाकातील संवेदनशील तंतू मुलायम होतात. दमा असणाऱ्यांसाठी जलनेती अत्यंत उपयुक्त असल्याचं मानलं जातं. त्यामुळे श्वसन प्रक्रिया सुरळीत होते. सायनस आणि मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी जलनेती उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं.

या गोष्टींपासून सावध राहा

जलनेती केल्यावर नासिका सुकल्या पाहिजेत. नासिका सुकवताना उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी सावध राहायला हवं. नासिका सुकवताना चक्कर येत असेल तर उभे राहूनच नासिका सुकवाव्यात. प्रयोगानंतर नाकात पाणी राहणार नाही, याची काळजी घ्या. नाही तर संक्रमणाचा धोका बळावतो. जलनेतीमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तिच्या देखरेखीतच हा प्रयोग करा. मनाने प्रयोग करू नका, असं सूत्रांनी सांगितलं. (use jal neti for fight against coronavirus, says mayor satish kulkarni)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 45 वर्षांच्या पुढील नागरिकांना आज लस, नागरिकांच्या रांगा

मोठी बातमी! भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी

अरे देवा! अमरावतीत म्युकरमायकोसिसचा शिरकाव; प्रशासनात खळबळ

(use jal neti for fight against coronavirus, says mayor satish kulkarni)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.