Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकट घोंघावतंय, पावसाच्या माहेरघरातच धरणं ओसाड होत चालली

पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीत सात मोठी धरणे आहेत. या धरणांच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागाला पाणीपुरवठा होतो. पण आता धरणांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी होत असल्याचं निर्दशनास येत आहे.

संकट घोंघावतंय, पावसाच्या माहेरघरातच धरणं ओसाड होत चालली
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 9:56 PM

शैलेश पुरोहित, Tv9 मराठी, नाशिक | 27 जानेवारी 2024 : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीत सात मोठी धरणे आहेत. या धरणांच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागाला पाणीपुरवठा होतो. ऑक्टोबर 2023 अखेर इगतपुरी तालुक्यातील ही सातही धरणे तुडुंब भरलेली होती. मात्र, साडेतीन महिन्यांतच आरक्षित पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. परिणामी, आजच्या स्थितीला दारणा, मुकणे यांसारख्या धरणात अवघा 43 टक्के साठा आहे. तसेच इगतपुरी तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणात अवघा 32 टक्के पाणीसाठा राहिल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आता भावली धरणातून शहापूर साठीही पाणी जाणार असल्याने तालुक्यातील हक्कदारांना पाणी द्यायचे किती आणि तालुक्यासाठी ठेवायचे किती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात 2022 मध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली होती. त्यात मराठवाडा येथील जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. त्यामुळे शासन धोरणानुसार इगतपुरी तालुक्यातील दारणा समूहातून पाण्याचा विसर्ग झाला नव्हता. मात्र, 2023 च्या हंगामात राज्यात बहुतांश भागात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणातही पुरेसा साठा झाला नसल्याने विशेषतः मराठवाड्यात ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या हंगामात जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याने जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी आणि दारणा समूहातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाण्याचा विसर्ग केल्याने इगतपुरी तालुक्यातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत यातील बहुतांश धरणात पाण्याचा साठा 50 टक्यांपेक्षा खाली आला आहे.

सद्य स्थितीत तालुक्यातील धरणातील पाण्याची टक्केवारी

भावली – ३२.६४ % कडवा – ३४.०६ % दारणा – ४३.४४ % मुकणे – ४४.०४ % वाकी – ५१.३३ % भाम – ५१.२६ %

२२ फेब्रुवारी अखेर जलसाठा (दलघफू)

धरण                       क्षमता      फेब्रुवारी २३         फेब्रुवारी २४ दारणा                     ७१४९          ५५७२                 ३१६३ मुकणे                      ७२३९          ६०३२                 ३३१८ वाकी                       २४९२           १४०२                 १३१६ भाम                         २४६४          १५९४                १३०३ भावली                     १४३४           १२९२                 ४९२ कडवा                      १६८८           ७७९                 ५८५

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.