नाशिकमध्ये काय असेल चित्र, लोकसभेचे आकडे आणि विधानसभेचे आडाखे

Assembly Election : लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत काय चित्र असेल., लोकसभेच्या आकड्यांवरुन विधानसभांचे आडाखे काय सांगतायत., पाहूयात नाशिकचा हा एक स्पेशल रिपोर्ट.

नाशिकमध्ये काय असेल चित्र, लोकसभेचे आकडे आणि विधानसभेचे आडाखे
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 10:03 PM

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली आहे. 2019 ला अखंड शिवसेना आणि भाजप युतीचे हेमंत गोडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या समीर भुजबळांविरोधात 2 लाख 92 हजार 204 मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असूनही हेमंत गोडसे यांचा मविआच्या राजाभाऊ वाझेंविरोधात 1 लाख 62 हजार मतांनी पराभूत झाले.

वास्तविक विधानसभेचंही गणित महायुतीच्या बाजूनं असूनही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नाशिक लोकसभा मतदारसंघ सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी या 6 विधानसभांमध्ये विस्तारला आहे.

यात महायुतीच्या बाजूनं सिन्नरमधील अजितदादांचे आमदार माणिकराव कोकाटे, नाशिक पूर्वेत भाजपचे आमदार राहुल ढिकळे, नाशिक मध्य मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमेत भाजप आमदार सीमा हिरे, देवळालीत अजितदादा गटाच्या आमदार सरोज अहिरे असे 5 आमदार महायुतीच्या बाजूनं तर मविआकडे एकमेव इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामन खोसकर होते. नाशिक जिल्ह्यात ठाकरेंचा एकही आमदार नसताना त्यांच्या उमेदवाराचा मोठ्या फरकानं विजय झाला.

सिन्नरमध्ये अजितदादांचे आमदार होते, पण मूळ वाझेही सिन्नरचे असल्यानं त्यांना 1 लाख 28 हजारांचं लीड मिळालं. नाशिक मध्य मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे., वाझेंनी इथं 3 हजार 800 चं लीड घेतलं. देवळालीत अजितदादांच्या आमदार सरोज अहिरे., वाझेंना इथं 27 हजारांचं लीड. आणि काँग्रेसचे आमदार असलेल्या इगतपुरीत वाझे 43 हजारांनी पुढे राहिले. तर शिंदे गटाच्या गोडसेंना भाजप आमदार राहुल ढिकळेंच्या मतदारसंघात 10 हजार 400 चं, आणि भाजप आमदार सीमा हिरेंच्या नाशिक पश्चिममधून 31 हजारांचं लीड मिळालं.

यंदा टक्केवारीतही महायुतीला मोठा फटका बसला. 2019 ला हेमंत गोडसेंनी 50.56 टक्के मतं घेतली होती., विरोधातल्या समीर भुजबळांना फक्त 24.37 टक्के मतं मिळाली. यंदा गोडसेंना 36.75 तर मविआच्या वाझेंना 49.85 टक्के मतं गेली. म्हणजे 2019 च्या तुलनेत महायुतीच्या मतांचा टक्का 13.81 नं घटला., तर दुसऱ्या बाजूला 25.48 टक्क्यांची वाढ झाली.

नाशिक लोकसभेच्या 6 पैकी 2019 च्या विधानसभेत युतीतून भाजप ३, शिवसेनेनं ३ जागा, आघाडीत राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसनं २ जागा लढवल्या होत्या. निकालानंतर भाजपचे ३, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसची 1 जागा निवडून आली.

महायुतीकडून कोण असतील उमेदवार

  • आगामी विधानसभेत महायुतीकडून सिन्नरमध्ये अजितदादा गटाचे माणिकराव कोकाटे
  • नाशिक पूर्वेतून भाजपचे राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे किंवा दिनकर पाटील
  • नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे किंवा शिंदे गटाचे अजय बोरस्ते
  • देवळालीत दादा गटकाडून सरोज अहिरे, भाजपकडून बबनराव घोलपांच्या कन्या तनुजा घोलप
  • शिंदे गटाकडून बबनराव घोलपांचं नाव चर्चेत आहे
  • इगतपुरीत अद्याप ठळकपणे कोणतंही नाव समोर आलेलं नाही

मवितातून कोण असतील उमेदवार

  • मविआत नाशिक मध्य मधून ठाकरे गटाचे सुधाकर बडगूजर
  • देवळालीतून ठाकरे गटाचे योगेश घोलप
  • इगतपुरीतून काँग्रेसचे हिरामण खोसकर किंवा ठाकरे गटाकडून निर्मला गावित
  • नाशिक मध्य मधून ठाकरे गटाचे वसंत गीते ही नावं चर्चेत आहेत
  • सिन्नर आणि नाशिक पूर्वमद्ये अद्याप कुणाचीही चर्चा नाही

2019 ला ६ पैकी ३ विधानसभा चुरशीच्या ठरल्या होत्या. सिन्नरमधून अजितदादा गटाचे माणिकराव कोकाटे अवघ्या 2 हजार 72 मतांनी जिंकले. नाशिक पूर्वेतून भाजपचे राहुल ढिकले 12 हजारनं विजयी राहिले., इथं वंचितला १० हजार मतं होती. नाशिक पश्चिमेतून भाजपच्या सीमा हिरे 9 हजार 746 मतांनी जिंकल्या. इथं मनसेनं 25 हजार मतं घेतली. इतर ३ जागांचा निकाल मात्र 25 हजारांहून जास्तीच्या फरकानं लागला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.