चैतन्य अशोक गायकवाड, नाशिक : सुंदर सोहळा बी प्रोफेशलनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रश्न असा होता की, तुम्हाला संधी का नाही मिळाली. लोकांच्या नजरेतील स्थानावर पाहते. काम मी पाहत राहीन. राजकारण हे माझ्यावर व्यवसाय नसून तो एक वॉर आहे. असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. नाशिकमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या. वाद घालणाऱ्या राजकारण्यांना मी कशाला संयमाचा सल्ला देऊ. प्रश्न विचारणाऱ्या माध्यमाला मी सल्ला देईन. रंगवून दाखविणाऱ्या माध्यमालाही मी सल्ला देईन. खऱ्या विषयाकडं आपलं ध्यान घ्या. खऱ्या विषयाकडं फोकस करा. समाजामध्ये गंभीर राजकारण आणि समाजकारण करण्याची आवश्यकता आहे.
राज ठाकरे म्हणाले राज्यात रोजगार कमी झाले. पण, मी काही राज ठाकरे यांची स्टेटमेंट ऐकली नाही. किंवा रोजगाराची आकडेवारी बघीतली नाही. त्यामुळं आकडेवारी पाहिल्यावरचं त्यावर टीपण्णी करू शकेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील पातळी घसरत चालली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं आपली मत फटाफट व्यक्त करू शकतात. चार लाईन येतात. लोकं ट्रोल होतात. यामुळं मुख्य मुद्याकडं लक्ष दिलं जात नाही. अतिरंजित विषय हाताळले जातात. दुसऱ्या मुद्यांकडे चिखलफेक केली जात आहे, हे दुर्दैवी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं. एखाद्या समारंभाला जाणं, गाडीत बसणं या गोष्टींना काही अर्थ नाही. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. शरद पवार यांच्या गाडीत एखादा नेता बसला असेल तर तो त्यांचा नम्रपणा आहे, असं मला वाटतं.
राजकारणात कुणीही कुणावर वैयक्तिक आरोप करू नये, असं मला वाटतं. ते मी स्वतः पाळत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांचा संयम मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाणार का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, माझा संयम इथपर्यंत घेऊन जाईल की या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. पंकजा मुंडे यांनी हसत हसत सांगितलं.