सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मागणार का?, नाशिक पदवीधर मतदार संघात पाठिंब्याबाबत सुधीर तांबे म्हणतात,…

काल सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. एबी फार्म मिळूनही त्यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही, असा ठपका सुधीर तांबे यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.

सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मागणार का?, नाशिक पदवीधर मतदार संघात पाठिंब्याबाबत सुधीर तांबे म्हणतात,...
सुधीर तांबे
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 4:32 PM

नाशिक : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नाही आणि मागणारदेखील नाही अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे ( Sudhir Tambe) यांनी म्हंटलं. आज निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत आहेत. आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार आहोत. अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे.

भाजपचा पाठिंबा मागणार का?

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अद्याप आम्हाला कुणीही पाठिंबा मागितला नसल्याचं सांगितलं. पाठिंबा मागितल्यास विचार करू, असंही ते म्हणाले होते. तुम्ही भाजपचा पाठिंबा मागितला होता, याबाबत विचारला असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारे भाजपचा पाठिंबा मागितला नाही. शिवाय भाजपचा पाठिंबा घेणारदेखील नसल्याची प्रतिक्रिया आमदार सुधीर तांबे यांनी दिली.

पाठिंबा मागणारही नाही

चार दिवसांपूर्वी भाजपकडे पाठिंबा मागणार असल्याचं वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केलं होतं. आता वडील सुधीर तांबे म्हणतात, आम्ही भाजपला पाठिंबा मागितला नाही आणि मागणारही नाही.

सत्यजित तांबे यांचेही निलंबन

दुसरीकडं सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आल्या आहेत. काल सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. एबी फार्म मिळूनही त्यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही, असा ठपका सुधीर तांबे यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.

१८ किंवा १९ जानेवारीला भूमिक स्पष्ट करणार

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला, असा ठपका ठेवून त्यांनाही निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर १८ किंवा १९ जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं सुधीर तांबे यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये तिरंगी लढत

नाशिकमध्ये तिरंगी लढत असणार आहे. यात सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असतील. शुभांगी पाटील याही अपक्ष उमेदवार असतील. तसेच सुभाष जंगले हेही अपक्ष आहेत. शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.