पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका

नवी मुंबईत  जोरदार पावसामुळे  धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत.

पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका
Navi Mumbai Kharghar waterfall
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:54 AM

नवी मुंबई : मुंबईसह, उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे नवी मुंबईत  जोरदार पावसामुळे  धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले होते.

यामध्ये 78 महिला , 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांना लेडरच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. रविवार असल्याने खारघरमधील डोंगराळ भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. बंदीचे आदेश असतानाही पर्यटक अशा ठिकाणांवर गर्दी करत आहेत. बंदी आदेश झुगारून पर्यटक डोंगराळ भागात गेले होते.

ओढ्याला पूर आल्याने पर्यटक अडकले

नवी मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खारघर सेक्टर 5 येथील धबधब्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दुतर्फी भरून वाहू लागल्याने, पर्यटक धबधब्यावर अडकले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास 116 पर्यटकांना ओढ्यावर सीडी लावून सुखरूप बाहेर काढले.

Navi Mumbai Kharghar waterfall-compressed

Navi Mumbai Kharghar waterfall-compressed

नवी मुंबईत जोरदार पाऊस 

नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नवी मुंबई , पनवेल परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेला आहे. कोरोडो रुपये खर्च करून बनवलेल्या गोल्फ कोर्सही पाण्याखाली गेला आहे. पांडवकडा आणि डोंगरातून येणारे पाणी थेट गोल्फ कोर्समध्ये शिरलं. त्यामुळे गोल्फ कोर्सला तलावाचे स्वरूप आले आहे.

200 मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नवी मुंबई शहरात सरासरी दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे सहावाजेपर्यंत पाऊस सुरू होता. आजही नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली. तर नऊ जागी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किट तर एक गॅस लिकेजची घटना घडली. शहरात 200.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद झाली.

नवी मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या असलेल्या मोरबे धरण क्षेत्रात 167.80 मिमी तर एकूण 1481.90 मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणाची पातळी 76.84 मीटरपर्यंत पोहोचली आहे.

शहरात सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे विभागात 211.50 मिमी, बेलापूर विभागात 201.20, नेरूळ 197.20, वाशी 193.90 तर ऐरोलीत 190.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत जोरदार पाऊस 

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.

हर्षल भदाणे पाटील, सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई 

VIDEO : धबधब्यावर अडकलेल्या प्रवाशांची सुटका

संबंधित बातम्या  

Weekend Trip | आठवडाभराच्या ताणाने कंटाळलायत? मग, मुंबईतील ‘या’ विरंगुळ्याच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Trekking Destinations | वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई-पुण्याजवळील या ठिकाणांना नक्की भेट द्या!

116 tourists stranded on a waterfall near Navi Mumbai rescued by fire brigade

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.