Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादा

एक वर्षापूर्वीपर्यंत विमानतळ पसिरातील इमारतींना उंचीसाठीची प्रमाणपत्रे सिडकोकडून दिली जात होती. या विमानतळाची उभारणी अदानी समूहाकडे गेल्यानंतर ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाने सिडकोकडून स्वत:कडे घेतले आणि काही महिने ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे कामच थांबवले.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादा
नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 1:18 AM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : नवी मुंबई विमानतळावरून विमान उडण्यापूर्वीच 20 किलोमीटरच्या परिसरत इमारतींच्या उंचीवर 55 मीटरची मर्यादा विमानतळ प्राधिकरणा (Airport Authority)ने घातली आहे. याचा अर्थ नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) परिसरात कोणतीही इमारत 12 ते 15 मजल्यांपेक्षा अधिक उंच (Hight) बांधता येणार नाही. जानेवारी 2021 पासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघात 1500 हून अधिक प्रकल्पांना ना-हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली. या प्रकल्पांची उंची आता 55 मीटरच्या आत ठेवण्यास सांगितले आहे. यापैकी 10 टक्के प्रकल्पांची उंची ही यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे गृहित धरले तर या उंचीच्या मर्यादेचा थेट फटका किमान 150 प्रकल्पांना बसणार आहे.

इमारतीची उंचीची मर्यादा कमाल 55.1 मीटर ठेवण्याची सक्ती

एक वर्षापूर्वीपर्यंत विमानतळ पसिरातील इमारतींना उंचीसाठीची प्रमाणपत्रे सिडकोकडून दिली जात होती. या विमानतळाची उभारणी अदानी समूहाकडे गेल्यानंतर ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरणाने सिडकोकडून स्वत:कडे घेतले आणि काही महिने ही प्रमाणपत्रे जारी करण्याचे कामच थांबवले. आता जी प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत त्यात कोणत्याही इमारतीची उंचीची मर्यादा जास्तीत जास्त 55.1 मीटर ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोने 2019 मध्ये 120 ते 130 मीटर उंचीचे अनेक गृहप्रकल्प मंजूर केले. याचा अर्थ या इमारतींची उंची सुमारे 40 मजली असेल. तळोजा, सानपाडा, वाशी आदी सेक्टरमध्ये हे प्रकल्प मंजूर झाले. पण आता नवी मुंबई विमानतळापासून 20 किलोमीटर परिसरात कोणत्याही इमारतीची उंची ही फार फार तर 14 ते 16 मजली असू शकेल.

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.