मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही निर्णय! पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार, 10वी, 12वीचं काय?
मुंबई पाठोपाठ नवी मुंबई पालिकेनंही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील शाळाही 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई पाठोपाठ नवी मुंबई पालिकेनंही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात येत असून शाळा पुन्हा ऑनलाईन सुरु राहणार आहेत. दरम्यान, दहावी बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. सगळ्यात मुंबई महानगरपालिकेनं शाळांबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ठाण्यातही शाळांबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच नवी मुंबईतही शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आजची रुग्णवाढ ही 12 हजारपेक्षा जास्त असल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. तर 11 रुग्ण आज दिवसभरात दगावले आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचे 9 रुग्ण नवी मुंबईत आज आढळून आले आहेत. तर 512 नव्या कोरोना रुग्णांचीही नवी मुंबईत भर पडली आहे. दररोजच्या रुग्णवाढीनं प्रशासनासह नागरीकही धास्तावले असून वेळीच खबरदारी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली जाते आहे.
सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी मुंबई 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. मुंबईतील चाचण्यांची क्षमताही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सगळ्यात आधी मुंबई पालिकेनं शाळांबाबत निर्णय घेत दहावी आणि बारावी सोडून इतर वर्ग हे ऑनलाईन सुरु ठेवण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. तर ऑफलाईन वर्ग हे फक्त दहावी आणि बारावीचेच सुरु राहणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. आजपासून राज्यातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली होती. वाढत्या रुग्णवाढीमुळे लहान मुलांमध्ये संसर्ग वाढू नये, यासाठी आता सर्वच पालिकांनी खबरदारी म्हणून ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
कोरोनाच्या इतर बातम्या –
Coronavirus: धारावी, दादर, माहीममध्ये कोरोनाचा कहर, दिवसभरात 262 नवे रुग्ण सापडले
कोरोनाचा कहर लसीकरणावर भर, प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झालं पाहिजे-आदित्य ठाकरे
गोव्यात आलेल्या कॉर्डेलिया जहाजात 66 कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन उतरण्याची परवानगी देणार?
आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आधी औरंगाबादेत, आता जालन्यात कोणते नियम मोडले?