1995 पासून नवी मुंबईतील लोकांचा कौल आम्हालाच, आताही आमचीच सत्ता येणार: आमदार गणेश नाईक

राज्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडली आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. निवडणुका लागलेल्या महापालिकांपैकी नवी मुंबईची (Navi Mumbai) निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.

1995 पासून नवी मुंबईतील लोकांचा कौल आम्हालाच, आताही आमचीच सत्ता येणार: आमदार गणेश नाईक
गणेश नाईक, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 8:34 AM

रवी खरात, नवी मुंबई : राज्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडली आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. निवडणुका लागलेल्या महापालिकांपैकी नवी मुंबईची (Navi Mumbai) निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेनं देखील नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. नवी मुंबई महापालिकेची सत्ता भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या गटाकडे आहे. गणेश नाईक यांनी आगामी काळात देखील नवी मुंबईकरांचा कौल आम्हालाच राहणार असल्याचं म्हटलं आहे. नवी मुंबईतील जनतेनं 1995 पासून आपल्यावरच जबाबदारी दिली असल्याचं ते म्हणाले. नवी मुंबई महापालिकेची मुदत कोरोना काळात संपली असून तेव्हापासून प्रशासकांच्यातर्फे कारभार सुरु आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असल्यानं महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

1995 सालापासून लोकांनी आम्हालांच कौल दिलेला आहे,असं गणेश नाईक म्हणाले. शांतपणे देशातील विविध राज्यातील शहरांचा विचार केला तर, 1995 सालापासून नवी मुंबईत आता 25 वर्ष जनतेने आम्हांलाच कौल दिलेला आहे. नवी मुंबईची जनता सुजान आहे समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं योग्य वेळी विचार करणारी आहे, असे गणेश नाईक म्हणाले.

पहिला महापौर ते आताचे महापौर आमचेच

नवी मुंबईचा पहिला महापौर संजीव नाईक हे आमचे होते. आताचे देखील आमचेच आहे, असं गणेश नाईक यांनी सांगितलं आहे. भाजप आमदार गणेश नाईकांनी आता देखील मनपा निवडणुकीत आपलीच सत्ता येणार असा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा होत असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या. दरम्यान पालिका मुख्यालयात आणि विविध प्रभाग कार्यालयांमध्ये 3852 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर सर्व पक्षांच्या हरकती आहेत. निवडणूक अयोग्य आणि नवी मुंबई महापालिकेने या हरकतींचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला पाहिजे. प्रभाग रचनेचा पुन्हा सर्वे करून ज्यांनी रास्त हरकती घेतल्या आहे. त्यांना न्याय दिला पाहिजे अशी भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आहे.

इतर बातम्या:

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, कोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा

दिलासादायकः बृहन्मुंबई महानगरपालिका‌ क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही; 2 जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच संख्या शून्यावर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.