पाच महिने ना घर पाहिलं, ना बायको पोरं… कुटुंबाबद्दल बोलताना कंठ दाटला; पहाडासारखे मनोज जरांगे गहिवरले

मराठा समाज आता प्रगतीकडे जाणार आहे. महाराष्ट्रातील 100 टक्के मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. मी लढायला खंबीर आहे. आरक्षणाला धक्का लागणार नाही. तुम्ही मजेत राहा. तुम्हाला सर्व आरक्षण मिळालंय. आता तुम्ही शिका. आरक्षणाचा फायदा घ्या. मोठं व्हा, असं तरुणांना आवाहन करतानाच आरक्षणात थोडं जरी खुट्टं वाटलं तर मला सांगा. मी लढायला तयार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पाच महिने ना घर पाहिलं, ना बायको पोरं... कुटुंबाबद्दल बोलताना कंठ दाटला; पहाडासारखे मनोज जरांगे गहिवरले
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 8:50 PM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं मनावर घेतलं आणि मैदानात उतरले… थेट जालन्याची अंतरवली गाठली. उपोषण सुरू केलं. बघता बघता समाज गोळा झाला, पाठिंबा दिला. कुणी आशीर्वाद दिले तर कुणी बळ दिलं… मनोज जरांगे यांनीही मग आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही असं ठरवलं. आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवणं दूर घराकडेच फिरकायचं नाही ठरवलं. आज पाच महिन्याच्या संघर्षाला यश आलं. विजयी दिमाखात मनोज जरांगे आज अंतरवलीत जाणार आहेत. मायबाप समाजाला भेटणार आहेत. त्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर मनोज जरांगे घरी जाणार आहेत. आज जाणार की उद्या निश्चित नाही. पण आज पाच महिन्यानंतर मनोज जरांगे कुटुंबाबद्दल भरभरून बोलले. कंठ दाटला, अश्रू तरळले… पहाडासारख्या मनोज जरांगेंना आज गहिवरून आलं होतं.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुटुंबाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तुम्हाला तीन मुली आहेत. एक मुलगा आहे. पत्नी, आईवडील आहेत. त्यांची आज आठवण होतेय का?, असा सवाल मनोज जरांगे यांना करण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे हळवे झाले. बोलताना मध्येमध्ये कंठ दाटत होता. डोळ्यात आसवांनी गर्दीही केली होती. जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी थेट संवाद साधून दिला तेव्हा तर जरांगे अधिकच हळवे झाले. मनसोक्त बोलले. कुटुंबाबद्दल बोलले. समाजाबद्दल बोलले.

आधी अंतरवलीत जाणार

शेवटी मी माणूस आहे. बाप आहे. तसाच मी समाजाचाही आहे. मी समाजाला कुटुंब मानल्यामुळे मला इकडेही लक्ष ठेवणं गरजेचं होतं. मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेवीन. पण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो लेकरांकडे कोण पाहिल? ते कसे आरामात राहतील? त्यामुळे पाच सहा महिने झाले मी उंबऱ्याला शिवणार नव्हतो. आता संपूर्ण समाजाचा आहे. त्यामुळे आधी अंतरवलीला जाणार. समाजाचं दर्शन घेणार. तिथेच पुढचे कार्यक्रम वगैरे ठरणार आहेत. त्यानंतर मग घराकडे जाणार. पण आधी अंतरवलीत जाणार. ते समाजाचं व्यासपीठ आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मावळे घराबाहेर पडताना…

घरी गेल्यावर कुटुंबाशी चर्चा होणारच आहे. अंतरवलीतून मग घरी जाईन. काम करत असताना कुटुंबाच्या सानिध्यात गेलं तर माया निर्माण होते. त्यामुळे कामाकडे लक्ष राहत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात मावळे घरातून बाहेर पडायचे ते यश घेऊनच यायचे. त्यामुळे एखादं कार्य हाती घेतलं तर आपण कुटुंबाकडे मागे वळून पाहिलं किंवा कुटुंबाच्या सुखात दुखात सहभागी झालो किंवा कुटुंबाचा हालहवाल कळाला तर आपण भावनिक होतो. त्यामुळे मी आंदोलनात कुटुंबाचा विचार करत नाही. फक्त समाजाचा विचार करतो. मायाजाळात अडकत नाही. कर्तव्य महत्त्वाचं, असं जरांगे म्हणाले.

पोरांनो, आता शिकून मोठं व्हा

आईवडील, बायको, मुलं सर्व माझ्यासोबत या लढ्यात ताकदीने उभे राहिले. माझा किंवा कुटुंबाचा संघर्ष हा समाजासाठी होता. वैयक्तिक नव्हता. समाज मोठा आहे. त्यामुळे समाजाने त्याग केला पाहिजे. तरच गोरगरीब मराठ्यांचा फायदा होईल म्हणून मी या लढ्यात उतरलो. समाजाला दैवत मानतो, तेव्हा जिथून आंदोलन सुरू झालं. तिथे जाणं तिथं माथा टेकणं हे माझं कर्तव्य आहे. (अश्रू तरळले, कंठ दाटला) नंतरच कुटुंबाला वेळ देता येईल. शेवटी समाज हा महत्त्वाचा आहे. मराठ्यांनी ताकदीने धडक मारली. न्याय मिळाला. आता मराठ्यांच्या पोरांनी शिकून मोठं व्हावं. आरक्षण मिळालं. आता आपल्याला आरक्षण मिळालंय, असं ते म्हणाले.

आयुष्याची भाकरी मिळाली

समाजाला कुटुंब मानलं आणि संघर्ष सुरू केला. 57 लाख नोंदी मिळाल्या. 57 लाख मराठ्यांना आयुष्याची भाकरी मिळाली. 2 कोटी मराठ्यांचा फायदा झाला आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही, त्यासाठीच अध्यादेश काढून घेतला. आता सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार आहे. आज माझ्या मराठा समाजाचा विजय झाला आहे, असं जरांगे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.