राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे इन अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे उद्घाटन करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. (mns leader amit thackeray will inaugurate five mns shakha)

राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे इन अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे उद्घाटन करणार
amit thackeray
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 10:49 AM

नवी मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असली तरी अमित ठाकरे मात्र अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन करणार आहेत.

अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत. आगमी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अमित यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे अमित यांचं स्वागत करणार आहेत.

राज यांना कोरोना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे. या दोघांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाहीमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

लसीचे दोन्ही डोसनंतरही कोरोनाची लागण

राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

मनसेचे सर्व मेळावे रद्द

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या:

शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची जोरदार टोलेबाजी

भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल; गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान

अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगल्यास तुरुंगवास नको, NDPS कायद्यात सुधारणेसाठी केंद्राची शिफारस

(mns leader amit thackeray will inaugurate five mns shakha)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.