नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षांनी नवी मुंबईवर (Navi Mumbai) लक्ष केंद्रीत केलं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक सध्या लांबणीवर पडलेली आहे. सध्या महापालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत., दुसरीकडे घणसोलीतील (Ghansoli) एका सोसायटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका निवडणुकीची झलक पाहायला मिळाली आहे. घणसोलीतील माऊली कृपा सोसाटीतील नागरिकांनी निवडणुकीत भाजप आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकस आघाडीच्या परिवर्तन पॅनेलनंन सोसायटीमधील 17 च्या जागा जिंकल्या आहेत. गणेश नाईक यांच्या उन्नती पॅनेलच्या पराभव झाला आहे.
माऊली कृपा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार संदीप नाईक यांनी लक्ष घातलं होतं. संदीप नाईक यांनी या निवडणुकीत ताकद लावली होती. मात्र, सोसायटीच्या विकासाचं काम महाविकास आघाडीच्यावतीनं सौरभ शिंदे यांनी मार्गी लावलं होतं. माऊली कृपा सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलनं 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवतं संदीप नाईक यांना धक्का दिला आहे.
नवी मुंबईतील घणसोली येथील माऊली कृपा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना धक्का देत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. माऊली कृपा सोसायटीमध्ये मोठ्या प्रमणात माथाडी कामगारांचं वास्तव्य आहे.
माऊली कृपा सोसायटीमधील संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलनं विजय मिळवला. या विजयासाठी सौरभ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीच्या विजयामुळं गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
इतर बातम्या:
PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड
MVA Panel won all seats in Ghansoli Mauli kripa Society beat Ganesh Naik and Sandeep Naik supported Panel