वेल डन नवी मुंबईकर, 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण, आता दुसऱ्यासाठीही टाळाटाळ नको!
नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. 100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरलीये. तर राज्यातील दुसरी महापालिका ठरलीये. 18 वर्षांवरील 11 लाख 7 हजार 233 नागरिकांना कोव्हिड लसीचा पहिला डोस देण्यात आलाय.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. 100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरलीये. तर राज्यातील दुसरी महापालिका ठरलीये. 18 वर्षांवरील 11 लाख 7 हजार 233 नागरिकांना कोव्हिड लसीचा पहिला डोस देण्यात आलाय.
पहिल्या डोससोबत दुसरा डोस ही 52 टक्के नागरिकांना देऊन झालाय. ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला आणि पुरुष कामगार, ऑटो/टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांच्याकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरुणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार करता आलं असल्याचे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय.
देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 623 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 197 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दोन लाखांच्या आत आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 623 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 197 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 19 हजार 446 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिया रुग्णसंख्येत मात्र घट https://t.co/LEXozY5oqi #coronavirus | #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021
संबंधित बातम्या :
IMF कडून आशियातील वाढीचा अंदाज कमी, कोरोनाची नवी लाट आणि पुरवठा साखळीतील समस्यांविषयी इशारा
दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा
लसींचे 95 हजार डोस शिल्लक, नागरिकांनी पुढे येण्याची गरज, जनजागृतीसाठी औरंगाबाद मनपाचे व्यापक प्रयत्न