BJP : महाविकास आघाडी घाबरली, नेते कार्यकर्ते बिथरले; महापौर भाजपचाच होणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले असल्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत (Ramchandra Gharat) यांनी सांगितले.
नवी मुंबई: महाविकास आघाडी (MVA) नवी मुंबई (Navi Mumbai) महानगर पालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक (Ganesh Naik) यांना शह देण्यासाठी एकत्र येणार आसल्याचे आज झालेल्या बैठकीनंतर नवी मुंबईतील नेत्यांनी सांगितले.मात्र, इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले असल्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत (Ramchandra Gharat) यांनी सांगितले. या नवी मुंबईचा विकास फक्त भाजपच करू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असं रामचंद्र घरत म्हणाले.
महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते बिथरले
खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बिथरले आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण कसं लढायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांचे कार्यकर्ते रोज आमच्याकडे येत आहेत. नाना पटोले स्वबळावर लढणार म्हणत होते. आता आघाडीच्या चर्चा सुरु आहेत. भाजपनं चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचं पानिपत केल्याचं आपण पाहिलं आहे. मंदा म्हात्रे आणि मी लढत होतो. मात्र, आता गणेश नाईक सोबत आल्यानं भाजपची ताकद वाढलीय. भाजपचा महापौर नवी मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल, असं रामचंद्र घरत म्हणाले आहेत.
काँग्रेस म्हणते निवडणुकीवर चर्चा नाही
एका बाजूला नवी मुंबईत महाविकास आघाडी करून निवडणुका लढल्या जातील अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली,मात्र मीटिंग नंतर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी,झालेल्या मीटिंग मध्ये एकत्र लढण्याचा किंवा कोण किती जागा लढवेल अशा प्रकारची चर्चाच झाली नसल्याचे सांगितलं.
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव
आज झालेल्या मीटिंग मध्ये निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी म्हटलंय. भाजपच्या विरोधात लढताना तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असला की काय घडतं हे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या अकोला वाशिम बुलडाणा आणि नागपूरच्या जागेच्या निवडणुकीवरुन दिसून आलं होतं. मात्र, अद्यापही काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नेत्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येत आहे.
इतर बातम्या:
यंदाच्या हिवाळ्यासाठी स्टाइलविषयी टिप्स हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात
Navi Mumbai BJP Chief Ramchandra Gharat said next mayor of city will be from BJP