नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिकांनी मांडली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा
Ramdas Athavale
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 3:29 PM

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA)दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Navi Mumbai International Airport should be named after D B Patil; Ramdas Athavale supports protes of locals)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी येत्या 10 जून रोजी भूमीपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होत आरपीआय कार्यकर्ते या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवणार आहेत, असे रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

माजी आमदार, माजी खासदार रायगडचे भूमिपुत्र नेते दिवंगत दि, बा, पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. कोकणातील शिक्षण प्रसारात दिबांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई, रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि. बा. पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे, ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य असून त्या मागणीला रिपब्लिकन पक्ष जाहीर पाठिंबा देत असल्याचे रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.

दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी रामदास आठवले यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी आठवले यांनी आपण आंदोलना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.

आंदोलनात आरपीआय सहभागी होणार

दिबांच्या नावासाठी होणाऱ्या आंदोलनात आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते सर्व ताकदीनिशी सहभागी होतील, असेही रामदास आठवले यांनी जाहीर केले. तसेच 10 जूनच्या मानवी साखळी आंदोलनाला आणि 24 जूनच्या सिडको भवनाला घेराव घालण्याच्या आंदोलनालाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

स्थानिकांची मागणी

तत्पूर्वी दिबा यांच्या नावासंबंधीची भूमिका सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी रामदास आठवले यांच्यापुढे विषद केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनीधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे.

1984 साली राज्यव्यापी शेतकरी आंदोलन

1984 साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

आता डिस्चार्जआधीच रुग्णालयाच्या बिलांचे लेखा परीक्षण, नवी मुंबई महापालिकेत कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष

(Navi Mumbai International Airport should be named after D B Patil; Ramdas Athavale supports protes of locals)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.