खारघरमध्ये डोंगरात वणवा भडकला! संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी, आजूबाजूच्या इमारतींमध्ये खळबळ

बुधवारी रात्री अकरा-साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या होत्या.

खारघरमध्ये डोंगरात वणवा भडकला! संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी, आजूबाजूच्या इमारतींमध्ये खळबळ
डोंगरला आग लागल्यानं एकच खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 2:06 AM

नवी मुंबई : बुधवारी रात्री नवी मुंबईच्या खारघर (Kharghar Fire) भागात भीषण आग भडकली. खारघरच्या डोंगराळ भागात वणवा पेटला होता. ही आगी बघता बघता संपूर्ण डोंगरात पसरली. या डोंगराला लागूनच मानवी वस्ती असल्यानं एकच खळबळ उडाली होती. अनेक इमारती या डोंगराच्या (Massive fire in Kharghar) आजूबाजूच्या भागात आहेत. त्यामुळे ही आग चिंतेचा विषय बनली होती. दरम्यान, या आगीची घटना उघडकीस आल्यानंतर तातडीनं पोलिसांसोबत अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. नेमकी ही आग कशामुळे भडकली, याची माहिती मिळू शकलेली नाही. मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ आकाशात पसरले होते. आगीची दाहकता किती प्रचंड आहे, याची कल्पनाही दूरवरुनही दिसून येत होती.

चिंताजनक बाब म्हणजे आगीच्या ठिकाणाहूनच हायटेन्शन विद्युप वाहिन्याही गेलेल्या आहेत. त्यामुळे अधिकच काळजी केली जात आहे. तसंच डोंगराच्या काही भागात आदिवासी पाडेदेखील आहेत. ही आग लागली, की लावली, याबाबत अद्याप स्पष्टता येऊ शकलेली नाही. बुधवारी रात्री अकरा-साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या होत्या.

पाहा व्हिडीओ :

नवी मुंबईत आगीच्या घटनांचं सत्र

नवी मुंबईच्या कळंबोली लोह पोलाद बाजारातीच्या इमारती मधील गळ्याला आग लागली होती. मंगळवारी ही आग लागली होती. कळंबोली स्टील मार्केट मधील फॅसिलिटी सेंटर समोरील रस्ता बाजार समितीने बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना ये-जा करता येत नाही. त्याचबरोबर समोरचे पार्किंग सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. हा रस्ता रहदारीचा बंद केल्याने मंगळवारी रात्री या ठिकाणी आग लागली असताना अग्निशमन बंब येण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागले होते. विलंब झाल्याने गाळ्या मधील अनेक वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

सुकापूरमध्ये आगीत एकाचा होरपळून मृत्यू

पनवेल जवळील सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिंम्पोनी सोसायटीमधील 28 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत एक महिला आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. तर एक महिला जखमी झाली असून तिला एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. दुपारच्या सुमारास बालाजी सिंम्पोनी येथील 2805 या फ्लॅटमध्ये अचाकनपणे आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच खांदेश्‍वर पोलिसांचे पथक व अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना होवून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. सदर महिला या कोणत्या कारणामुळे या आगीत होरपळल्या तसेच हा घातपाताचा तर प्रकार नाही ना? याबाबत अधिक तपास खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या :

सिडकोची नवी मुंबईकरांना होळी भेट, 6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा

काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.