तर मी 10 मिनिटात येईल… नितेश राणेंची हिंदूंना शपथ काय?

भाजपचे नेते नितेश राणे काल नवी मुंबईतील उलवे येथे होते. उलवे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाची आरती करून दर्शनही घेतलं. त्यानंतर त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

तर मी 10 मिनिटात येईल... नितेश राणेंची हिंदूंना शपथ काय?
नितेश राणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 4:52 PM

भाजपचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आहे. नवी मुंबईतील उलवे येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात नितेश राणे यांनी हिंदूंना आर्थिक बळकटीकरणाची शपथ दिली. पाकिस्तान आणि बांगलादेशात आपल्याला खिजगणतीत धरलं जात नाही. मग आपणही आपलं बळकटीकरण केलं पाहिजे. कुणाच्या भरवश्यावर बसता कामा नये. आपली एकजूट असेल तर आपण या देशाला नव्या उंचावर नेऊ शकतो, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे हे उलवे येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आलं. नितेश राणे यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हिंदूंनी हिंदूंसोबतच आर्थिक व्यवहार करण्याचं आवाहन केलं. तशी शपथच त्यांनी हिंदुंना दिली. उलवे हा परिसर हिंदुंचाच राहिला पाहिजे, असं सांगतानाच उलवेत काही झालं तर मला बोलवा मी अवघ्या 10 मिनिटात येईल, असंही नितेश राणे म्हणाले.

आधारकार्ड तपासा

कुणालाही तुमची घरे विकू नका. घरे विकताना संबंधितांचं आधार कार्ड तपासा. कारण खोट्या नावाने व्यवहार होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नावे पाहूनच व्यवहार करा. सक्षम करायचं असेल तर हिंदूंनाच करा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.

हिंदूंची एकजूट दिसू द्या

यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिमांशी कोणतेही व्यवहार न करण्याचं आवाहनही केलं. कोणत्याही धमक्यांना घाबरू नका. हिंदूंची एकजूट दिसली पाहिजे. तुमच्यातही कडवटपणा आलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रचंड गर्दी

उलवे येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. हा उत्सव अत्यंत दणक्यात साजरा केला जात आहे. राजकीय नेते या उत्सवाला भेट देत असून गणेश भक्तांशीही संवाद साधत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत येथील यंदाच्या गणेशोत्सवाला प्रचंड गर्दी झाली आहे. नितेश राणे यांनीही काल या परिसरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांना ऐकण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.