Panvel Corona | कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण, पनवेलची सद्यस्थिती काय?
पुन्हा एकदा गेल्यावर्षी प्रमाणे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. (Panvel Corona one year)
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण सापडून एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी 10 मार्च 2020 ला पनवेलमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. कोरोना रुग्णाच्या वर्षपूर्तीनंतर कोरोना पनवेलमधून नष्ट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र तसे न होता, आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. (Panvel Corona one year complete)
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी आढळला होता. पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून 100 हून अधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गेल्यावर्षी प्रमाणे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.
पनवेल शहरात इतर शहरांच्या तुलनेत संसर्ग कमी
गेल्या वर्षभरामध्ये सर्वच पनवेलकर स्वतःचा जीव धोक्यात कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. यात सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, एनजीओ, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे पनवेल शहरात इतर शहरांच्या तुलनेत कोरोनाची लागण कमी झाली होती. तरीसुद्धा गेल्या वर्षभरामध्ये 648 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत होता. तर 30 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली.
पनवेल मनपाचे आवाहन
सद्यस्थितीमध्ये लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यामुळे अनेक लोक हे कुठल्याही प्रकारचे प्रोटोकॉल पाळत नाही. अनेक जण नियम न पाळता रस्त्यावर मार्केटमध्ये फिरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. यामुळे पनवेलमध्ये संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जर कोरोनावर मात करायची असेल तर मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे अतिशय गरजेचे आहे.
तसेच अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा या गोष्टी पाळल्या पाहिजेत. तरच आपण कोरोनापासून वाचू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की, आपण कोरोनाचे नियम पाळा आणि कोरोनावर मात करा, असं आवाहन पनवेल मनपाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पनवेल कोरोना अपडेट
सद्यस्थितीत पनवेल महापालिकेत 33 हजार 404 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पनवेल महापालिकेत काल 132 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात 615 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Panvel Corona one year complete)
उस्मानाबादमध्ये प्रतिबंधात्मक आदेश; दर रविवारी जनता कर्फ्यू; धार्मिक स्थळे आणि आठवडी बाजार बंद#osmanabadcurfew #janatacurfew #coronavirus #coronawavehttps://t.co/LxLJiT7ktm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021
संबंधित बातम्या :
जालन्यात फक्त 20 जणांमध्ये लग्न लागणार, जास्त लोक जमल्यास कारवाई; कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Corona Virus News: चिंता वाढली! राज्यात 13,659 नवे रुग्ण सापडले