’25 नोव्हेंबरनंतर इंग्लडहून परतलेल्या व्यक्तींनी त्वरित महानगरपालिकेशी संपर्क साधा’
25 नोव्हेंबर नंतर नवी मुंबईत आलेल्या व्यक्तींच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. | Navi Mumbai Mahanagar Palika

नवी मुंबई: ब्रिटनसह युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (coronavirus new strain) आढळल्यानंतर राज्यात देशाबाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. (Navi Mumbai Mahanagarpalika New rules for people return from UK)
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेनेही एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 25 नोव्हेंबर नंतर नवी मुंबईत आलेल्या व्यक्तींच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पालिकेकडून अशा लोकांची यादी तयार केली जात असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे.
ज्या व्यक्ती 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरून नवी मुंबईत आल्या आहेत त्यांनी स्वत:हून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी / आरोग्य विभाग मुख्यालयाशी संपर्क साधून अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या विशेष सर्वेक्षणात सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सदर व्यक्तींकरिता आरटी-पीसीआर चाचणी सुविधा एमजीएम रूग्णालय, सेक्टर 30, सानपाडा,वाशी येथे करण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगून मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे व “कोव्हीड बचावात्मक अनुकूल वर्तन (COVID Appropriate Behavior)” ठेवणे गरजेचे आहे. सुरक्षा नियमांचे पालन हीच करोनापासून बचावाची ढाल आहे हे लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
संबंधित बातम्या:
थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच
Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?
(Navi Mumbai Mahanagarpalika New rules for people return from UK)