Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cidco Housing Project : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्त

महागृहनिर्माण योजना प्रकल्पाकरीता 30,000 हजार कोटींचा खर्च अंदाजित असून त्यापैकी 4,000 कोटींचा खर्च हा सिडकोकडून, 5,000 कोटी बॅंकेच्या पतपुरवठ्याद्वारे आणि उर्वरित खर्च हा प्रकल्पातील अंतर्गत उत्पन्न स्त्रोतांद्वारे करण्यात येणार आहे. सिडकोने या योजनेच्या मार्केटिंग आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे.

Cidco Housing Project : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्त
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:37 PM

नवी मुंबई : सिडको महामंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजने (PM Awas Yojana) अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून 5 हजार कोटींचा 735845 (Credit) मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या घरांच्या बांधकामास गती मिळून सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न (Dream) साकार होणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे महागृहनिर्माण योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेस 6 % व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला असून एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. सदर महागृहनिर्माण योजना आपल्या देशातील व जगातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ठरेल यात शंका नाही, असे सिडकोचे तथा व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सांगितले.

महागृहनिर्माण योजना प्रकल्पाकरीता 30,000 हजार कोटींचा खर्च अंदाजित असून त्यापैकी 4,000 कोटींचा खर्च हा सिडकोकडून, 5,000 कोटी बॅंकेच्या पतपुरवठ्याद्वारे आणि उर्वरित खर्च हा प्रकल्पातील अंतर्गत उत्पन्न स्त्रोतांद्वारे करण्यात येणार आहे. सिडकोने या योजनेच्या मार्केटिंग आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. जेणेकरून संपूर्ण विक्री प्रक्रियेदरम्यान आणि विक्री पश्चात सेवा सुलभतेने प्रदान करण्यात येतील. महागृहनिर्माण योजनेसाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारे सिडको हे पहिले सरकारी प्राधिकरण ठरले आहे.

‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित आहे ही योजना

नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सिडकोतर्फे राबवण्यात येणारी ही महागृहनिर्माण योजना ‘परिवहन केंद्रीत विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे. ज्यात 1,12,500 सदनिकांचा समावेश आहे. यातील प्रथम टप्प्यामध्ये 23500, द्वितिय टप्प्यामध्ये 67000 आणि तृतीय टप्प्यामध्ये आणखी 22000 सदनिकांचा समावेश आहे. यापैकी 35 % सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी आहेत तर 15 % सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी व उर्वरित सदनिका खुल्या घटकासाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील.

हे सुद्धा वाचा

जागांची उपलब्धता, आर्थिक नियोजन, वैधानिक परवानग्या, प्रकल्प संनियंत्रण यंत्रणा या सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे काम करून सिडकोने महागृहनिर्माण योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. या महागृहनिर्माण योजनेतील टप्पा-1 मधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून टप्पा-2 मधील घरांचे बांधकामही वेगाने सुरू आहे. योजनेच्या टप्पा-3 मधील घरांच्या बांधकामासही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. महागृहनिर्माण योजनेतील गृहसंकुले ही नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणार आहेत. या गृहसंकुलांना सध्या अस्तित्वात असलेल्या हार्बर, ट्रान्स-हार्बर रेल्वे व प्रगतीपथावर असणाऱ्या नेरूळ-उरण या रेल्वे मार्गांद्वारे आणि राज्य महामार्गांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. यामुळे या गृहसंकुलांतील रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशातील विविध व्यापारिक क्षेत्रांपर्यंत (बिझनेस डिस्ट्रिक्ट) कराव्या लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होणार आहे. (Received credit of Rs.5000 crore for CIDCO Maha Housing Yojana)

'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.