खालापूर दुर्घटना… नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी, मदतीसाठी पोलीस अधिकारी तैनात; हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खालापूर दुर्घटना... नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी, मदतीसाठी पोलीस अधिकारी तैनात; हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य
landslideImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 9:20 AM

खालापूर | 20 जुलै 2023 : खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात 50 ते 60 घरे दबली आहेत. या दरडीखाली 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच या गावातील कुटुंबाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अनेक नजरा मातीच्या ढिगाऱ्याखाली आपल्या नातेवाईकांना शोधत आहेत. काही जण धायमोकलून रडत आहेत. या सर्वांसाठी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.

खालापूर येथे दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केलं आहे. एनडीआरएफच्या दोन टीम, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि इतर गावातील रहिवासी मदतकार्य करत आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. तसेच या ठिकाणी एक पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आला आहे. तसेच पीडीत कुटुंबीयांच्या नातेवाईकांसाठी आणि पीडितांसाठी या ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

34 जणांना वाचवले

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत एकूण 34 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.

मदतकार्य सुरू

अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

मात्र, अत्यंत चिंचोळा भाग आणि उंच टेकडीवर गाव असल्याने वर पोकलेन किंवा जेसीबी जाऊ शकत नाही. त्यामुळे कुदळ, फावडं आणि खोऱ्याच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही मदत करण्यात येणार आहे. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरद्वारे किती मदत होईल यावर शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री फिल्डवर, उपमुख्यमंत्री नियंत्रण कक्षात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन आदी नेते मंडळी घटनास्थळी पोहोचले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. अजित पवार हे नियंत्रण कक्षातून खालापूरनजीक इरशालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

हेल्पलाईन नंबर

8108195554

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.