राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन

तिसरी लाट थोपवायची असेल तर कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक आहे, असे आवाहन आमदार रमेश पाटील यांनी नोशील नाका येथे केले.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन
MLA Ramesh Patil
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 11:22 PM

नवी मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरदेखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, ही बाब आरोग्य विभागाने मान्य केली आहे. तसेच कोरोना लस घेतलेल्या व्यक्तीला संसर्ग झाला तरी तुलनेने लक्षणे सौम्य असल्याने त्रास कमी होतो. तसेच कोरोनाच्या दोन लाटा मागील दीड वर्षात येऊन गेल्या. तिसरी लाट थोपवायची असेल तर कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक आहे, असे आवाहन आमदार रमेश पाटील यांनी नोशील नाका येथे केले. (Risk of third wave of corona in the state, vaccination essential; MLA Ramesh Patil appeal to citizens)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व नागरिकांसाठी मोफत लस देण्याची घोषणा केली. त्याची तात्काळ अंमलबाजवणी आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. त्यांनी नोशील नाका येथील आपल्या स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयात मनपाच्या सहकार्याने लसीकरणासाठी नावे नोंदविण्याचा शुभारंभ केला. त्यावेळी आमदार रमेश पाटील बोलत होते.

आमदार रमेश पाटील यांनी सांगितले की, लसीकरणासाठी नोंदणी ही मनपाच्या सहकार्याने होत आहे. नवी मुंबईमधील ज्या नागरिकांना लस हवी असेल त्यांनी आमदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. यावेळी व्यासपीठावर राज्य भाजप मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड चेतन, माजी नगरसेवक तानाजी पाटील, जयेश मोरे,अनिल राठोड आदी उपस्थित होते.

लसीकरण नोंदणी साठी विवेक मूर्ती 9970696186 आणि लक्ष्मण कोळी 99702630068 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केलं आहे.

दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आजपासून देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आजच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचं लसीकरण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 5 कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकार आजपासून प्रत्येक भारतीयांसाठी’ मोफत लसीकरण मोहीम ‘सुरू करीत आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यातील सर्वाधिक लाभार्थी देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुण असतील. आपण सर्वांनी स्वतःला लस घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण देशातील नागरिक एकत्र येऊन कोरोनाचा पराभव करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Vaccination : महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

Maharashtra Coronavirus LIVE Update : नागपूर जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी

(Risk of third wave of corona in the state, vaccination essential; MLA Ramesh Patil appeal to citizens)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.