Video: शिवेंद्रराजेंनी दम भरताच शिंदे नेमकं काय म्हणाले? जावळीत राजकीय संघर्ष वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वक्तव्यावर पक्ष वाढीसाठी संघर्ष करायला तयार असल्याचं म्हटलंय. Shashikant Shinde comment on Shivendrasinghraje Bhonsale

Video: शिवेंद्रराजेंनी दम भरताच शिंदे नेमकं काय म्हणाले? जावळीत राजकीय संघर्ष वाढणार?
शिवेंद्रसिहराजे भोसले शशिकांत शिंदे
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 12:36 PM

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पक्ष वाढीसाठी संघर्ष करायला तयार असल्याचं म्हटलंय.सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कार्यक्रमात “मी उदयनराजेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवून आलेला माणूस आहे, समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही” असं म्हणत शिवेंद्रसिंहराजे बरसले होते. भाजपचे राज्यसभा खासदार आणि चुलतबंधू उदयनराजे यांचा उल्लेख करत शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. (Shashikant Shinde comment on Shivendrasinghraje Bhonsale statement)

पक्षवाढीसाठी संघर्षाला तयार, शशिकांत शिदेंचे प्रत्युत्तर

आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की माझ्यामध्ये आणि शिवेंद्रराजेंमध्ये कोणाताही वाद नाही. मी माझं पक्ष वाढविण्यासाठी काम करतो. जावळी मतदार संघामध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. मी माझ्या मतदारसंघामध्ये आता काम करत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे तसं वाटत असावे. मात्र, पक्षवाढीसाठी संघर्ष करायला लागला तर मी तयार आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी जावळीमध्ये काम करत असल्यानं त्यांना माझा हस्तक्षेप वाढलाय, असं वाटलं असावं, शशिकांत शिंदे म्हणाले.

पक्षानं साताऱ्यातून लढायला सांगितलं होतं

शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जावळीमधून निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, मी साताऱ्याऐवजी कोरेगावमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडेही माणुसकी आहे. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांचं सर्वात अगोदर स्वागत करेन. मात्र, ते भाजपमध्ये असतील तर मला सातारा जावळीत राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी कामं करावं लागेल, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

शिवेंद्रसिंह राजे काय म्हणाले?

“मग.. माझी वाट लागली तरी चालेल, याला संपवायचं ना.. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार, ही आमची भूमिका आहे. काट्याने काटा काढायचा, मी पण मग मागे फिरणारा नाही. मी पण कुणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.

छत्रपतींचं घराणं आहे, आपली भांडणं, मारामाऱ्या… नाव खराब व्हायला नको. मग आम्हीपण एकत्र आलो. आम्ही एकत्र आलेलो काही जणांना बघवत नाही, माझ्या कानात काहीतरी सांग, त्यांच्या कानात काहीतरी सांग, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.

संबंधित बातम्या:

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे

साताऱ्यात दोन ‘राजें’चं मनोमीलन, भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी चर्चा

(Shashikant Shinde comment on Shivendrasinghraje Bhonsale statement)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.