Corona | नियम कडक, पण पाळतंय कोण? APMCमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केट बंद करावं लागणार?
रुग्णसंख्येचा भडका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. APMC मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढू लागल्याचं चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळलेत. कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी नियम बाजूला ठेवून जगायला सुरुवात केली होती. नियम (Rules) शिथिल झाल्यानंतर सगळेच थोडे शिथिल झाले होते. मात्र, कोरोना (Corona) संपला नसून तिसऱ्या लाटेची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. तसंच ओमिक्रॉनने आपला संसर्ग वाढवण्यास सुरुवात केली असून कोरोनाच्या रुग्णसंख्या मध्ये दुप्पट वाढ नोंदवली जाऊ लागल्यानं चिंतेत भर पडली आहे.
एपीएमसीत नियमांना केराची टोपली!
वाढत्या रुग्णसंख्येच्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने विभागीय दक्षता पथकाची नेमणूक केली आहे. 2 दिवसात जवळपास 3 लाख रुपये दंड वसूल केला आहे. परंतु या विशेष पथकांना एपीएमसी मार्केट परिसरात दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये किरकोळ व्यापार सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महिन्यात दुप्पट झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे.
नियम कडक, पण पाळतंय कोण?
बेलापूर विभागातील रुग्णसंख्या अधिक असली तरी एपीएमसी मार्केटमध्ये लाखो लोकांची ये-जा रोजच होत असते. त्यामुळे रुग्णसंख्येचा भडका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. APMC मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबईची चिंता वाढली असून नववर्षाच्या पार्शवभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. दोन नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. 1 डिसेंबरला रुग्णसंख्या 252वर आली होती. यानंतर रुग्णवाढ आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत फरक पडत गेला आहे. प्रतिदिन रुग्णसंख्या वाढू लागली असून आता सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल पाचशेवर गेली आहे. सर्वच नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रादुर्भाव वाढत आहे. बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली या परिसरात नवीन रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठका वाढविल्या असूनसर्वांना उपाययोजना वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षाजास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंधने घातली आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात एकावेळी 100 व खुल्या जागेत 250 पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीच्या संख्येतही वाढ केली आहे. सरासरी 8 ते 10 हजार चाचण्या नियमित केल्या जात आहेत.
इतर बातम्या –
Corona : मुंबईकरांना धडकी, कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे रुग्ण
Mumbai | आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन
VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती