Navi Mumbai: नवी मुंबईत ओमिक्रॉनचा धोका वाढतोय, सरकारकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त

महापालिका प्रशासनाने विभागीय दक्षता पथकाची नेमणूक केली असून दोन दिवसात जवळपास 3 लाख रुपये दंड वसूल केला आहे. परंतु या विशेष पथकांना एपीएमसी मार्केट परिसरात दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये किरकोळ व्यपार सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईत ओमिक्रॉनचा धोका वाढतोय, सरकारकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 11:10 PM

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमीक्रॉनचे 2 रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेली काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी नियम बाजूला ठेवून जगायला सुरुवात केली होती. मात्र, कोरोना संपला नसून तिसऱ्या लाटेची शक्यता सरकारने व्यक्त केली होती. शेवटी ओमिक्रॉनने आपला संसर्ग वाढवण्यास सुरुवात केली असून कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट वाढीस लागली आहे.

महापालिका प्रशासनाकडून विभागीय दक्षता पथकाची नेमणूक

या धर्तीवर महापालिका प्रशासनाने विभागीय दक्षता पथकाची नेमणूक केली असून दोन दिवसात जवळपास 3 लाख रुपये दंड वसूल केला आहे. परंतु या विशेष पथकांना एपीएमसी मार्केट परिसरात दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये किरकोळ व्यपार सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महिन्यात दुप्पट झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. बेलापूर विभागातील रुग्णसंख्या अधिक असली तरी एपीएमसी मार्केटमध्ये लाखो लोकांची ये-जा प्रति दिन होत असते. त्यामुळे रुग्णसंख्येचा भडका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. परंतु APMC मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबईची चिंता वाढली असून नववर्षाच्या पार्शवभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 500 वर

नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. दोन नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. 1 डिसेंबरला रुग्णसंख्या 252 वर आली होती. यानंतर रुग्णवाढ व कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत फरक पडत गेला आहे. प्रतिदिन रुग्णसंख्या वाढू लागली असून सद्यस्थितीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 500 वर गेली आहे. सर्वच नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रादुर्भाव वाढत आहे. बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली या परिसरात नवीन रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठका वाढविल्या असूनसर्वांना उपाययोजना वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंधने घातली आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात एकावेळी 100 व खुल्या जागेत 250 पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीच्या संख्येतही वाढ केली आहे. सरासरी 8 ते 10 हजार चाचण्या नियमित केल्या जात आहेत. (The threat of Omicron is increasing in Navi Mumbai, the government has expressed the possibility of a third wave)

इतर बातम्या

Corona | नियम कडक, पण पाळतंय कोण? APMCमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केट बंद करावं लागणार?

APMC Market: मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये इराणी सफरचंद जोमात; काश्मिरी शेतकरी कोमात

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.