पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरे यांचा दुर्घटनाग्रस्तांना दिलासा आणि ग्वाही

मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही.

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरे यांचा दुर्घटनाग्रस्तांना दिलासा आणि ग्वाही
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 12:39 PM

खालापूर | 22 जुलै 2023 : मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे आज पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते. दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. पण राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. त्या डोंगर उतरावर किंवा डोंगराच्या खाली आहेत. तिथे कधीही दरडी कोसळू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नीट काळजी घ्या

मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याआधी पुनर्वसन झालं असतं तर चांगलं झालं असतं. केवळ घर देणं म्हणजे पुनर्वसन होणं नाही. त्यांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल हे पाहा. कंटनेरमध्ये जास्तीत जास्त दिवस राहणार नाही याची काळजी घ्या. यात मी राजकारण आणत नाही. दु:ख मोठं आहे. सावरावं लागेलच. आम्ही तुमच्यासोबत राहू. नीट काळजी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कुणावरही वेळ येता कामा नये

तुम्ही एकत्र संवाद ठेवा. तुमची टीम तयार करा. तुम्ही धक्क्यातून सावरल्यावर काय करायचं ते सांगा. कुटुंब म्हणून मी सोबत आहे. हात जोडून विनंती करतो. जागा निवडताना धोका होणार नाही अशीच जागा सांगा. बऱ्याच वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. टप्प्याटप्प्याने करू. तुमचंही कसं पुनर्वसन करायचं हे आपण ठरवू. तुमचा परत जीव जाता कामा नये. मी सरकारशी बोलणार आहे. सरकार येत असतं आणि जात असतं. पण आपण सर्वांचं पुनर्वसन करू. कुणावरही परत ही वेळ येऊ देता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.

जेवणा खाण्याची सोय आहे का?

यावेळी त्यांनी स्थानिकांना तुमच्या जेवणा खाण्याची सोय झाली आहे का? राहण्याची व्यवस्था आहे का? प्यायला पाणी मिळते का? अशी आपुलकीने विचारपूस केली. आपल्याला परत परत हा धोका पत्करायचा नाही. आता परत जीव जाऊ द्यायचा नाही. शेळ्या मेंढ्या गेल्या हे दुर्देव आहे. तुम्ही एकत्र व्हा. पूर आणि दरडीचा धोका होणार नाही अशी जागा सांगा. तिथे तुमचं पुनर्वसन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तहसीलदारांना सूचना

यावेळी त्यांच्याकडे गावातील लोकांनी समस्या नोंदवल्या. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह कसे सापडले? घटना कशी घडली? कमावती मुलं कशी गेली? याची माहिती या लोकांनी उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही तहसीलदारांशी संवाद साधून त्यांना सूचना केल्या. येथील चार वाड्या धोक्याच्या आहेत. त्या सर्व एकत्र करा. त्यांचं एकत्रित आणि चांगल्या जागी पुनर्वसन करा. स्थानिकांना विश्वासातच घेऊन पुनर्वसन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.