नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

या पथकाने सापळा रचून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली असता, त्यामधील नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. या दुचाकी त्यांनी ठाणे, नवी मुंबई परिसरातील त्यांच्या मित्रांकडे लपविल्या होत्या.

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या
नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 11:04 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतून दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत बाल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 9 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दोन गुन्हेगाराना पकडण्यात आले असून तिसरा फरार आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीला यापूर्वीदेखील अटक झाली असून, अल्पवयीन असल्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Vehicle thefts from minors for fun in Navi Mumbai)

चौकशीत आरोपींकडून सहा गुन्ह्यांची कबुली

नेरुळ व उलवे परिसरात वास्तव्याला असलेले काही बाल गुन्हेगार वाहनचोरी करीत असल्याची माहिती मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, हवालदार लक्ष्मण कोटकर आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सापळा रचून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. अधिक चौकशीत त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली असता, त्यामधील नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. या दुचाकी त्यांनी ठाणे, नवी मुंबई परिसरातील त्यांच्या मित्रांकडे लपविल्या होत्या. त्यांचा अल्पवयीन तिसरा साथीदार पोलिसांच्या हाती लागला नसून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या अल्पवयीन टोळीने यापूर्वीदेखील शहरात वाहनचोऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वीदेखील त्यांना अटक झालेली आहे. यानुसार आजवर या टोळीकडून 20 हून अधिक दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

अल्पवयीन मुलीचेही अपहरण केले

गुन्हा करूनही केवळ अल्पवयीन असल्याने आपल्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा फायदा या टोळीकडून घेतला जात आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यास बालसुधारगृहात राहून आल्यानंतर ते पुन्हा वाहनचोरी करायचे, चोरलेल्या मोटरसायकल मौजमजेसाठी वापरल्यानंतर, त्या ओळखीच्या मित्रांकडे ठेवून द्यायचे. त्यामुळे एकापेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत देखील कठोर कारवाईची कायद्यात तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे. या अल्पवयीन मुलांच्या टोळीपैकी एकाने शहरातून मुलीचे अपहरण देखील केले असल्याची माहिती समोर येत आहे. सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून राज्याबाहेर पळवून नेले असल्याचे समजते. यातून सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचेही सूत्रांकडून समजते. त्याद्वारे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखा पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहेत. (Vehicle thefts from minors for fun in Navi Mumbai)

इतर बातम्या

Retrospective Tax: केंद्र सरकारने पूर्वलक्षी कर घेतला मागे, केअर्न-व्होडाफोनला मोठा फायदा होणार

PHOTO | जान्हवी कपूरने केली वीकेंडला मजा-मस्ती, धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.