Yashashri Shinde : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, घटनेच्या दिवशीचे CCTV फुटेज समोर, ती ‘तिसरी’ व्यक्ती कोण?

Yashashri Shinde Murder Case : नवी मुंबईतील उरण येथील यशश्री हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात दाऊद यशश्रीचा पाठलाग करताना दिसला. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे.

Yashashri Shinde : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, घटनेच्या दिवशीचे CCTV फुटेज समोर, ती 'तिसरी' व्यक्ती कोण?
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी माहिती समोर
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 11:14 AM

नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने राज्य हादरले आहे. 20 वर्षाच्या यशश्रीची दाऊद शेख याने निर्घृण हत्या केली. तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडुपात फेकला. मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे मुसक्या आवळल्या. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहे. यशश्री पुढे चालत असताना दाऊद तिचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसून येते. तर या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. काय आहे अपडेट…

दाऊदवर अगोदरच पोक्सो

2019 मध्ये यशश्री ही केवळ 15 वर्ष 4 महिन्यांची होती. ती इयत्ता 11 वीत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. आरोपी ड्रायव्हर दाऊद हा तिचा पाठलाग करत असे. ती महाविद्यालयात अथवा शिकवणीला जात होती, त्यावेळी तिचा पाठलाग करत होता. तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. 14 सप्टेंबर 2019 रोजी आरोपीने तिला बळजबरी मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. ती ओरडून नये, म्हणून तिचे तोंड दाबले. त्याचवेळी यशश्रीचे वडील तिथून जात होते. त्यांनी लागलीच धाव घेतली. त्यांनी दाऊदला चांगलेच फटकारले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत दाऊदने तिथून पळ काढला. या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. आरोपीविरोधात पोक्सा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

यशश्रीच्या खूनाची तयारी

आरोपीला गुन्ह्यात तुरुंगवास झाला. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हापासून दाऊद यशश्रीचा खून करण्याच्या तयारीत होता. 25 जुलै रोजी यशश्री सकाळी घरुन 10 वाजता निघाली. मैत्रिणीच्या घरी जायचे असल्याने तीने कार्यालयातून सुट्टी घेतली होती. वडील घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी मुलीच्या मैत्रिणीशी संवाद साधला असता ती आली नसल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. 27 जुलै रोजी तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडुपात आढळला.

सीसीटीव्हीत काय?

सोमवारी भाजप आणि ठाकरे गटाचे नेते यशश्रीच्या घरी गेले. त्यांनी आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी केली. घटनेच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यशश्री पुढे चालत असताना आणि दाऊद तिचा पाठलाग करत असताना दिसत आहे. याच भागात यशश्रीचा मृतदेह मिळाला होता.

अजून एकाची चौकशी

सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.