CCTV Video : नवी मुंबईत लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने तरुणांनी बाऊन्सरला केली बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

मारहाण करणारे सर्व तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास बाऊंसरकडून मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाऊंजच्या बाऊन्सरला बेदम मारहाण केली.

CCTV Video : नवी मुंबईत लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने तरुणांनी बाऊन्सरला केली बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबईत लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने तरुणांनी बाऊन्सरला केली बेदम मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:28 PM

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लाउंज आणि हुक्का पार्लरमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. वाशी येथील सतारा प्लाझा हे हुक्का पार्लर आणि लाऊंजचे हब बनलंय. येथील ऑरेंज मिंट या लाऊंज (Lounge)मध्ये प्रवेश नाकारल्याने आठ ते दहा जणांच्या टोळीने लाऊंजच्या बाहेर बाऊन्सरला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक नसल्याची माहिती समोर आली आहे.

लाऊंजमध्ये गर्दी असल्याने बाऊंसरने तरुणांना आत जाण्यास मनाई केली

मारहाण करणारे सर्व तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास बाऊंसरकडून मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाऊंजच्या बाऊन्सरला बेदम मारहाण केली. सदर मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दरम्यान, नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लाऊंजमुळे असे प्रकार घडत आहेत.

सांगलीत गर्दुल्यांचा शिवभोजन केंद्रावर धिंगाणा

सांगलीतील मिरज शहरमधील एसटी स्टॅन्ड परिसरातील शिव भोजन केंद्रावर धिंगाणा घातला. केंद्राची तोडफोड करून तेथील केंद्रचालकांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकीही दिली आहे. नशेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मिरज एसटी स्टॅन्ड परिसरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नियमानुसार शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. सर्वसामान्यांपासून गरीबांना याचा लाभ होत आहे. परंतु मिरज एसटी स्टॅन्ड परिसर, रेल्वे स्टेशन रोडवर असलेले गर्दुल्यांनी या शिवभोजन केंद्रावर येवून केंद्र चालक महिलेस शिवीगाळ करून केंद्राची तोडफोड केली. तसेच अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Youths beat up bouncer for refusing to enter a lounge in Navi Mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.