AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये; रवी राणा यांच्या विधानाने मोठी खळबळ

मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. की कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानावर रवी राणा यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये; रवी राणा यांच्या विधानाने मोठी खळबळ
Navneet ranaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 7:25 PM

मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत मी येथील खासदाराला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव काही चांगला नव्हता, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. पवार यांची ही टीका राणा कुटुंबीयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्याचा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मागच्या निवडणुकीत पवार साहेबांनी नवनीत राणांना पाठिंबा दिला. प्रचार करायला आले. शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच नवनीत राणा खासदार झाल्या. शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या, त्या भाजपसोबत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी अजित पवारांना त्यांनी पाठवलं, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.

विरोध फक्त ओठांवर

सुप्रिया सुळेंच्या हट्टापायी त्यांना थांबावं लागलं. शरद पवारांच्या मनामध्ये भाजप आहे. फक्त ओठावर विरोध आहे. शरद पवार साहेबांच्या मनामधील भाजपमध्येच नवनीत राणा आहेत. काँग्रेसच्या दबावामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आज ते बोलले असतील, असा टोलाही राणा यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे नाचोळे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजप सोबत बेईमानी केली. अमरावतीमध्ये हिंदुत्वाला डिवचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरेंचं खोटं हिंदुत्व उघड पडलेलं आहे, असंही ते म्हणाले.

बच्चू कडू मीडिया प्रेमी

यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू हे मीडियाप्रेमी आहेत. मीडियामध्ये राहण्याची त्यांना सवय आहे. मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टीआरपी मिळवणे त्यांना आवडते. मैदानासाठी आम्ही परवानगी मागितली. सर्व परवानगी आमच्याजवळ आहे. बच्चू कडू हे हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध करतात, असा आरोप त्यांनी केला.

'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.